चांदवड : एनजीएन न्यूज नेटवर्क
1971 मध्ये एसएनजेबीचा निरोप घेऊन आकाशात झेपावलेले हे पक्षी प्रचंड कामगिरी व यश मिळवून 54 वर्षानंतर परत श्री माधवराव कोतवाल यांचे रेणुका लॉन्स चांदवडमध्ये दिनांक 26 व 27 डिसेंबर 2025 रोजी स्नेहसंमेलनासाठी जमा झाले होते.
अविनाश दीक्षित, सुरेश नेरकर,प्राध्यापक प्रमोद पलोड,सौ सूर्यमाला छाबडा, अरुण सोनजे, जयप्रकाश चव्हाण, सुभाष अजमेरा, डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांच्या नियोजन समितीच्या प्रयत्नाने हे सर्व गोळा झाले. सर्वप्रथम गुरुवर्य श्री शेळके सर श्री गांधीमुथा सर श्री लोढा सर, नगरसेविका सौं लीलाबाई कोतवाल व नगरसेवक श्री महेंद्र गांधी मुथा यांचे हस्ते दीप प्रज्वलन केले..
एस एन जे बी चे संस्थापक स्वर्गीय काकाजी आबड व सर्व स्वर्गीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी व दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. त्यानंतर सौं सुनंदा सोनजे यांनी स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले.. गुरुवर्यांचा व नगरसेविका सौं लीलाबाईकोतवाल व नगरसेवक श्री महेंद्र गांधी मुथा यांचा नियोजन समितीतर्फे शाल, पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.. श्री शेळके सरांनी त्यांच्या 94 वर्षाच्या अनुभवातून त्यांची कामगिरी सांगितली ती आम्हाला खूप प्रेरणादायी ठरली.. आता पूर्वीसारखे शिक्षक राहिले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आम्हाला आशीर्वाद देताना आता तुमचे तरुण पण संपले आहे आता स्वतःला सांभाळा स्वतःसाठी जगा असा अनमोल सल्ला दिला.
अविनाश दीक्षितने तयार केलेल्या 57 मित्र-मैत्रिणींची माहिती असलेली माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले..श्री गांधी मुथा सरांनी सुद्धा आम्हा सर्वांना शुभेच्छा व आशीर्वाद दिलेत. सरांना व सर्वांना आमचा परिचय आम्ही थोडक्यात करून दिला सह भोजनानंतर ग्रुप फोटो सेशन झाले त्यानंतर सर्वांनी आपल्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात काय केले याचा सविस्तर परिचय करून दिला… त्याची परिचय पुस्तिका लवकरच प्रकाशित केली जाईल.. विनोदी कविता, गाणे, शेर शायरी, भजने, गवळण, चारोळ्या, अंताक्षरी यांनी विविध गुणदर्शनात रंग भरले काही मित्रांनी नृत्य सादर करून कार्यक्रमात रंग भरले यात सर्वांनी सहभाग घेतला. डिसेंबर महिन्यात ज्याचे ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस होते तेही केक कापून साजरे करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी आमच्या जिव्हाळ्याची एस एन जे बी शाळेला भेट दिली अनेकांना जुन्या आठवणीने भावनाशील बनविले आमच्या शाळेत आमचे अतिशय भव्य स्वागत करण्यात आले. सर्वांची इच्छा पूर्ण करणाऱ्या इच्छापूर्ती गणेशाच्या व ग्रामदेवता श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन सर्वजण चंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यास चंद्रेश्वर ला पोहोचलो.तेथील प्रसन्न वातावरण व थंडगार हवेने मन प्रसन्न झाले तेथेच सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला रंगमहालाचे नक्षीकाम डोळ्यात भरत होते संपूर्ण रंग महाल फिरून शेजारील श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेऊन स्नेहसंमेलनाचा निरोपाचा भावपूर्ण कार्यक्रमाने स्नेहसंमेलनाचा शेवट झाला. आठवण म्हणून तेथेच आम्हा प्रत्येकाला ग्रुप फोटोची प्रत देण्यात आली. सर्वांनी पुन्हा पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्व मित्रांचा निरोप घेतला दोन दिवसाच्या हा स्नेहसंमेलनाचा भरगच्च कार्यक्रम 70 वर्षापेक्षाही जास्त वय असलेल्या आम्हा सर्व मित्रांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करून गेला जगण्याची उमेद वाढवून गेला.
शब्दांकन प्रा. प्रमोद शांतीलाल पलोड (94 208 28 758)
Comments are closed.