NGN News
Latest Marathi News

आठवीतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाचा अत्याचार; जीवे मारण्याची धमकी

  • नंदुरबार जिल्ह्यातील तलई येथे संतापजनक प्रकार उघडकीस

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नंदुरबार जिल्ह्यातील तलई येथे उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे मुख्याध्यापकाच्या या कृत्यात महिला अधीक्षिका सामील झाली. या दोघांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करत निलंबनाचे आदेश काढले आहेत. या घटनेमुळे आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. रायसिंग वसावे आणि मालती पाडवी अशी निलंबित केलेल्या दोघांची नावे आहेत.

 मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार करून विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकारात महिला अधीक्षिकेचेही संगनमत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी दोहोंच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. दोन्ही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. या घटनेने शासकीय आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments are closed.