- अमृतमहोत्सव सोहळ्यास दिग्गजांची उपस्थिती; सोहळा ठरला समाजप्रबोधनाचा व्यापक मंच
लहवित : एनजीएन न्यूज नेटवर्क
जगद्गुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महाराजांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ‘लहवितकर महाराजांचे कार्य हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून समाजसुधारणेचा, माणुसकीचा आणि राष्ट्रनिर्मितीचा दीपस्तंभ आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
श्रीक्षेत्र लहवित येथे आयोजित अमृतमहोत्सव सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजप्रबोधनाचा व्यापक मंच ठरला. संतपरंपरा, कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक संदेश यांच्या माध्यमातून महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. हजारो भाविकांसह राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. याप्रसंगी अन्न व औषधद्रव्य प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्करराव भगरे, ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सरोजताई अहिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉ. किरण लाहामटे, आमदार हिरामण खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी अध्यात्माला केवळ पूजा-पाठापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक जाणिवेची आणि राष्ट्रहिताची दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, सामाजिक समता, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांवर आधारित त्यांचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा संतविभूतींचे विचार हे केवळ एका काळापुरते नसून पिढ्यान्पिढ्या समाजाला योग्य मार्ग दाखवणारे ठरतात.
राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “संतपरंपरेतून समाजाला दिशा देण्याचे काम लहवितकर महाराजांनी केले. त्यांनी कधीही जात, पंथ, पक्ष यांची भिंत उभी केली नाही. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. आज समाजात वाढत चाललेली असहिष्णुता, ताणतणाव आणि नैराश्य पाहता महाराजांचे विचार अधिकच समर्पक व मार्गदर्शक ठरतात.” माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “लहवितकर महाराजांचे कार्य हे अध्यात्म, शिक्षण आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रांना दिशा देणारे आहे. युवकांमध्ये मूल्याधिष्ठित विचार, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव निर्माण करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. आजच्या स्पर्धात्मक युगात यशाबरोबरच माणुसकी जपण्याचा संदेश महाराजांच्या कार्यातून मिळतो.”
यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम
या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली तुपे, राहुल महाराज गायकवाड, तुकाराम महाराज शिंदे, राहुल महाराज खालकर, सुर्यकांत महाराज सहाणे, दीपक महाराज पोरजे, हर्षद महाराज जाचक, संदीप महाराज लोहकरे, ऋषिकेश महाराज गायखे, कैन्हया महाराज लोणारे, तेजस महाराज खालकर, तुषार महाराज खालकर, वैभव महाराज गाढवे, शुभम महाराज कड, सागर महाराज सांगळे, भुषण जाधव, सूरज महाराज शिंदे, अवधूत महाराज आहेर आदींनी विशेष परिश्रम घेतले. ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी, स्वयंसेवक तसेच लहवित व पंचक्रोशीमधील ग्रामस्थ व भाविकांच्या सामूहिक योगदानामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या अमृतमहोत्सव सोहळ्यास माजी खासदार हेमंत गोडसे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार वैभव पिचड, भाजप नेते विजय साने, लक्ष्मण सावजी, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, मविप्रच्या माजी सरचिटणीस निलीमाताई पवार, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, त्र्यंबकराव गायकवाड, मुरलीधर पाटील, सुधाकर बडगुजर, भाजप नेते दिनकर पाटील, नारायण वाजे, उदय सांगळे, सचिन ठाकरे, निवृत्ती जाधव, अॅड. सोमनाथ घोटेकर, नारायण मुठाळ,दिगंबर गीते,संपतराव सकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.