NGN News
Latest Marathi News

जाणून घ्या क्रिटिकल थिंकिंग अर्थात चिकित्सक विचार पद्धतीबद्दल..

** एनजीएन न्यूज नेटवर्क

क्रिटिकल थिंकिंग (Critical Thinking) किंवा चिकित्सक विचार पद्धती म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर त्या माहितीचे सखोल विश्लेषण करून, त्यातील सत्यता पडताळून पाहणे आणि तर्कसंगत निर्णय घेण्याची क्षमता होय.

आजच्या ‘माहितीच्या स्फोटा’च्या युगात (Information Age), जिथे सोशल मीडियावर रोज हजारो अफवा पसरतात, जिथे आपल्याला खूप लोकांकडून, मोठया समुदाया कडून एकाचवेळी वेगवेगळ्या स्वरूपात माहिती मिळते तिथे क्रिटिकल थिंकिंग हे एक अत्यंत आवश्यक कौशल्य बनले आहे.

ज्या ठिकाणी मोठी कुटुंब आहेत, एकत्रित कुटुंब आहेत, खूप लोकं एकत्र काम करतात अशी कार्यालये आहेत, एकत्रित व्यवसाय आहेत, राजकीय पक्ष अथवा सातत्याने नवनवीन घटना घडतील आणि त्या संबंधित माहिती निर्माण होईल अश्या जागा आहेत तेथे क्रिटिकल थिंकिंग खूप आवश्यक असते

क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच विचार करण्याची आधुनिक कला
होय. साध्या शब्दात सांगायचे तर, समोर आलेली माहिती जशीच्या तशी न स्वीकारता, तिला ‘का?’, ‘कसे?’, ‘कुणी?’ आणि ‘कशासाठी?’ हे प्रश्न विचारणे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण माहितीचे वस्तुनिष्ठपणे (Objectively) विश्लेषण करतो. क्रिटिकल थिंकिंगच्या पायऱ्या लक्षात घेणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीचा चिकित्सक विचार करताना पुढील टप्प्यांचा वापर होतो.

निरीक्षण (Observation) परिस्थिती किंवा माहितीचे बारकाईने निरीक्षण करणे.
त्यानंतर विश्लेषण (Analysis) करणे म्हणजेच माहितीचे लहान तुकड्यांत विभाजन करून ती समजून घेणे. तर्क (Inference) उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून योग्य निष्कर्ष काढणे. त्यानंतर संवाद (Communication) म्हणजेच आपले विचार स्पष्टपणे आणि पुराव्यासहित मांडणे.
समस्या निवारण (Problem Solving) केवळ दोष न काढता त्यावर सर्वांगीण योग्य तो उपाय शोधणे.

चिकित्सक विचार करणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये अभ्यासल्यास लक्षात येते की हे लोकं सगळ्यांपेक्षा वेगळे का असतात?
ज्या व्यक्तीचे क्रिटिकल थिंकिंग उत्तम असते, ती व्यक्ती स्वतःचे पूर्वग्रह (Biases) बाजूला ठेवून विचार करते. केवळ भावनेच्या भरात वाहून जात नाही. अशी व्यक्ती पुराव्यांची मागणी करते आणि स्त्रोताची विश्वासार्हता तपासते. या व्यक्ती फक्त हा माझा आहे तो माझा नाही, हा जवळचा आहे, तो लांबचा आहे, हा मित्र आहे, दुसरा शत्रू आहे या अनुषंगाने कधीच विचार करत नाही, तर सगळी परिस्थिती अथवा घटना पूर्ण समजावून घेते. अशी व्यक्ती दुसऱ्याची बाजू ऐकून घेण्याची तयारी ठेवते सोबतच स्वतःच्या चुका मान्य करण्यास कचरत नाही.

क्रिटिकल थिंकिंग चे दैनंदिन जीवनातील महत्त्व प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.
फेक म्हणजेच खोट्या न्यूजपासून स्वतःचा बचाव करणे. व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर येणारे मेसेज खरे की खोटे हे ओळखण्यासाठी याची मदत होते. फक्त सामाजिक माध्यमातील बातम्या आणि माहितीच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील, कुटुंबातील, समाजातील जीं काही माहिती आपल्याला मिळते, समजते अथवा सांगितली जाते त्यावर योग्य आणि खोलात जावून विचार करणे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग होय

अश्या लोकांची डिसिजन मेकिंग पॉवर म्हणजेच योग्य निर्णय क्षमता जसे की करिअर निवडणे असो किंवा आर्थिक गुंतवणूक, चिकित्सक विचार करून केलेली असते. अशी विचारलं जाणून घ्या क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार पद्धती बद्दल

क्रिटिकल थिंकिंग (Critical Thinking) किंवा चिकित्सक विचार पद्धती म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर त्या माहितीचे सखोल विश्लेषण करून, त्यातील सत्यता पडताळून पाहणे आणि तर्कसंगत निर्णय घेण्याची क्षमता होय.

आजच्या ‘माहितीच्या स्फोटा’च्या युगात (Information Age), जिथे सोशल मीडियावर रोज हजारो अफवा पसरतात, जिथे आपल्याला खूप लोकांकडून, मोठया समुदाया कडून एकाचवेळी वेगवेगळ्या स्वरूपात माहिती मिळते तिथे क्रिटिकल थिंकिंग हे एक अत्यंत आवश्यक कौशल्य बनले आहे.

ज्या ठिकाणी मोठी कुटुंब आहेत, एकत्रित कुटुंब आहेत, खूप लोकं एकत्र काम करतात अशी कार्यालये आहेत, एकत्रित व्यवसाय आहेत, राजकीय पक्ष अथवा सातत्याने नवनवीन घटना घडतील आणि त्या संबंधित माहिती निर्माण होईल अश्या जागा आहेत तेथे क्रिटिकल थिंकिंग खूप आवश्यक असते

क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच विचार करण्याची आधुनिक कला
होय. साध्या शब्दात सांगायचे तर, समोर आलेली माहिती जशीच्या तशी न स्वीकारता, तिला ‘का?’, ‘कसे?’, ‘कुणी?’ आणि ‘कशासाठी?’ हे प्रश्न विचारणे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण माहितीचे वस्तुनिष्ठपणे (Objectively) विश्लेषण करतो. क्रिटिकल थिंकिंगच्या पायऱ्या लक्षात घेणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीचा चिकित्सक विचार करताना पुढील टप्प्यांचा वापर होतो.

निरीक्षण (Observation) परिस्थिती किंवा माहितीचे बारकाईने निरीक्षण करणे.
त्यानंतर विश्लेषण (Analysis) करणे म्हणजेच माहितीचे लहान तुकड्यांत विभाजन करून ती समजून घेणे. तर्क (Inference) उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून योग्य निष्कर्ष काढणे. त्यानंतर संवाद (Communication) म्हणजेच आपले विचार स्पष्टपणे आणि पुराव्यासहित मांडणे.
समस्या निवारण (Problem Solving) केवळ दोष न काढता त्यावर सर्वांगीण योग्य तो उपाय शोधणे.

चिकित्सक विचार करणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये अभ्यासल्यास लक्षात येते की हे लोकं सगळ्यांपेक्षा वेगळे का असतात?
ज्या व्यक्तीचे क्रिटिकल थिंकिंग उत्तम असते, ती व्यक्ती स्वतःचे पूर्वग्रह (Biases) बाजूला ठेवून विचार करते. केवळ भावनेच्या भरात वाहून जात नाही. पुराव्यांची मागणी करते आणि स्त्रोताची विश्वासार्हता तपासते.
दुसऱ्याची बाजू ऐकून घेण्याची तयारी ठेवते. स्वतःच्या चुका मान्य करण्यास कचरत नाही.

क्रिटिकल थिंकिंग चे दैनंदिन जीवनातील महत्त्व प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.
फेक म्हणजेच खोट्या न्यूजपासून स्वतःचा बचाव करणे. व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर येणारे मेसेज, फोटो, विडिओ, रेकॉर्डिंग खरे की खोटे हे ओळखण्यासाठी याची मदत होते. योग्य निर्णय क्षमता अश्या लोकांमध्ये मोठया प्रमाणात पाहायला मिळते. करिअर निवडणे असो किंवा आर्थिक गुंतवणूक, आयुष्यातील नौकरी, व्यवसाय या बद्दल चे निर्णय, कठीण परिस्थिती मध्ये घेतले जाणारे निर्णय हे लोकं बहुतांशी अचूक घेवू शकतात.

चिकित्सक विचार आपल्याला आर्थिक, मानसिक आणि भावनिक फसवणुकीपासून वाचवतो.
कामाच्या ठिकाणी कंपन्या अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात जे गुंतागुंतीच्या समस्यांवर डोकं लावून तोडगा काढू शकतात.
लोकशाहीसाठी आवश्यक एक सुजाण नागरिक म्हणून राजकीय प्रचार आणि आश्वासने यांतील फोलपणा ओळखण्यासाठी हे कौशल्य गरजेचे आहे. ज्या प्रमाणे सामाजिक, राजकीय वर्तुळात क्रिटिकल थिंकिंग सहाय्यक ठरते त्याच प्रमाणे आयुष्यातील अगदी छोटया घटना, आपल्या संपर्कातील लोकं, घरातील नात्यातील लोकं, त्यांचं बोलण, हेतू, मानसिकता, उद्देश, मित्र मंडळी, व्यावसायिक भागीदार, सह कर्मचारी या सगळ्यांच्या वागण्याचा बोलण्याचा अर्थ योग्य पद्धतीने काढून, समजून घेणेसाठी क्रिटिकल थिंकिंग खूप मोठे योगदान देत असते.

क्रिटिकल थिंकिंग कसे विकसित करावे? हे प्रत्येकाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. हे कौशल्य सरावाने वाढवता येते. दरवेळी स्वतःला सवय लावा. स्वतःला प्रश्न विचारा “हे असेच का आहे?” किंवा “याचा पुरावा काय?”, छोटया तल्या छोटया गोष्टीला सुद्धा काहीतरी पुरावा अथवा आधार असतो. त्यामुळे कोणी कितीही काहीही सांगेन, बोलेल ते शंभर टक्के खरं आहे असे अजिबात गृहीत धरू नका. एखाद्या व्यक्ती चे ते मत असू शकते, मत आणि सत्य यात खूप मोठा फरक आहे हे लक्षात ठेवा उदाहरणार्थ एका व्यक्तीने आपल्या काही मित्रांना त्याच्या वाढदिवसाच्या निम्मित मोठी पार्टी दिली आणि सगळ्यांनीच एकत्र खूप मजा केली, आनंद घेतला. आता त्यातील ऐक मित्र आपल्याला भेटल्यावर सांगतो की सगळ्यांनी त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लुटून खाल्लं रे, खूप नुकसान केल त्याच. वास्तविक कोणीही जबरदस्ती न करता, स्वखुशीने ज्या व्यक्तीने पार्टी दिली आणि ज्यांनी ती मित्र म्हणून घेतली त्यात देणारा अथवा घेणारा यांचा उद्देश लुटणे, लुबाडणे हा नव्हताच पण केवळ त्यातील एका व्यक्तीचे ते वैयक्तिक मत असल्यामुळे प्रकरणाला वेगळे, चुकीचे वळण लागू शकते.

स्वतःला प्रश्न विचारायची सवय लावा, माहितीचा स्रोत तपासा म्हणजे ती माहिती कोणी दिली आणि त्यामागे त्यांचा काय हेतू असू शकतो, याचा विचार करा. कोणी वैयक्तिक द्वेषपोटी, खुन्नस म्हणून दुसऱ्या व्यक्ती ला बदनाम करण्यासाठी, त्याची इज्जत प्रतिष्ठा कमी करण्यासाठी तर चुकीची माहिती पसरवत नाही न याचा शहानिशा दरवेळी करत जा. जे लोकं हलक्या कानाचे असतात, ज्यांना स्वतःची वैचारिक शक्ती शून्य असते ते कोणी काहीही भावनिक होवून सांगितलं की ते खरं मानतात. असे लोकं हीच चुकीची माहिती जास्त पसरवण्यात, तिला अजून तिखट मीठ लावून चर्चा करण्यात, गोसीपिंग साठी ही माहिती वापरण्यात, इतरांची मन कलुशीत करण्यात स्वतःचा वेळ, ऊर्जा अनावश्यक खर्च करतात.

दरवेळी नाण्याची दुसरी बाजू पहा. तुमच्या मतापेक्षा वेगळे मत असणाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐका. एखाद्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्याला मध्ये सतत विरोध न करणे, त्याचे बोलणे पूर्ण होवू देणे हे खऱ्या प्रगल्भ मानसिकतेचे लक्षण आहे.

घाईत कधीही कोणता निर्णय घेऊ नका. कोणतीही मोठी प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा वेळ थांबून विचार करा. आपल्याला प्रतिसाद देता आला आहे प्रतिक्रिया देण खूप सोपं असत प्रतिसाद द्यायला विषयाची जान, भक्कम माहिती त्या सोबत सबळ कारणे अथवा पुरावे, संयम याची आवश्यकता असते. याउलट प्रतिक्रिया देणारा अत्यंत उथळ, अर्धवट आणि स्वतःच्या मूर्ख पणाचे प्रदर्शन करून मोकळा होतो. यामुळे अश्या लोकांच्या बोलण्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या शी संभाषण टाळले जाते आणि त्यांना कोणत्याही मुख्य महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जातं नाही.

क्रिटिकल थिंकिंग म्हणजे कोणावरही विश्वास न ठेवणे असे नाही, तर आंधळा विश्वास न ठेवणे होय. हे आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवते आणि आपल्या बुद्धीला धार लावत अनेकदा जवळच्या नात्यांमध्ये आंधळं प्रेम, अंध विश्वास, अती अपेक्षा, संबंधित व्यक्तीचा खूप मान ठेवलेला असतो अश्या परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्ती च्या बोलण्यावर वागणूकिंवर, व्यवहारंवर शंका घेतली जातं नाही. या सवयी मुळे अत्यंत मोठे वैयक्तिक, कौटुंबिक नुकसान झालेले पाहायला मिळते. त्यामुळे व्यक्ती कोणीही असो आपण त्या च्या प्रत्येक कृतीच, बोलण्याचं, वागण्याचं क्रिटिकल थिंकिंग करणे गरजेचे आहे.

काउनसेलर मीनाक्षी जगदाळे
9766863443

Comments are closed.