** पुरुषोत्तम कांडेकर
📍 देवळाली : एनजीएन न्यूज नेटवर्क
रक्षा मंत्री उत्कृष्टता पुरस्कार 2025 अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ छावणी — स्वस्थ छावणी’ स्पर्धेत देशातील ६१ छावणी परिषदांमध्ये छावणी परिषद देवळाली ने प्रथम स्थान मिळवले आहे. या अद्भुत यशामुळे देवळाली छावणी परिषद राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापनामधील उत्कृष्टतेसाठी आदर्श ठरली, त्याच बरोबर दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येते त्यातही देवळाली छावणी परिषद त्यांच्या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले होते
या वर्षी रक्षा मंत्री उत्कृष्टता पुरस्कार 2025 मध्ये निवड समितीने ‘स्वच्छता, आरोग्य, प्रशासनिक उत्कृष्टता व सार्वजनिक सहभाग’ या निकषांनुसार सर्व छावणी परिषदांचे मुल्यमापन केले होते. त्यामध्ये देवळाली छावणी परिषदाने त्यांच्या अंतर्गत स्वच्छता मोहिमांमध्ये, कचर्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक जागांच्या स्वच्छतेत, प्रभावी जलनिकास व्यवस्था, लोकांमध्ये स्वच्छता संदेशाचा प्रसार यांसारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी दर्शवली. त्यामुळे त्यांनी देशभरातील सर्व छावणी परिषदांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल छावणी परिषद देवळालीचे अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, “महामंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा समर्पण, स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि सुव्यवस्थित नियोजन यामुळेच हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे.”
या यशामुळे नुसतेच स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सुधारले नाही, तर इतर छावणी परिषदांना देखील प्रेरणा मिळाली आहे की सतत सुधारणा, सहभाग आणि सामूहिक प्रयत्नांनी मोठे लक्ष्य साध्य करता येते.
✨ देवळाली छावणी परिषद यांनी देशात प्रथम स्थान प्राप्त करून आपल्या छावणीचे नाव उच्चत्तम स्वच्छता परिषद म्हणून उजाडले आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासन व नागरिकांसाठी गौरवाची बाब ठरली आहे. छावणी परिषद देवळालीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, सहायक अभियंता वि.आर.पाटील, आरोग्य तांत्रिक सल्लागार शाजेब सय्यद आरोग्य निरीक्षक मयूर सौदे,शुभम शेंडगे,व सर्व कर्मचारी वर्ग छावणी परिषद यांनी शर्तीचे प्रयत्न केले त्याचे यशस्वी फलित निकालातून दिसून आले.
Comments are closed.