नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अविष्कार ही केवळ स्पर्धा नसून संशोधन, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेकडे नेणारी एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. साध्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेतून पाहणारा तरुणच खरा संशोधक ठरतो आणि जिज्ञासेपासूनच नवकल्पनांची सुरुवात होते. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. तुळसीदास निंबेकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अविष्कार – २०२५’ हीविभागीय पातळीवरील संशोधन स्पर्धा के के वाघ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, नाशिक येथे संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, गोंदिया महाविदायाचे प्राचार्य डॉ. तुळसीदास निंबेकर हे उपस्थित होते.
तरुण संशोधकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा हेतू होय. अविष्कार स्पर्धेत नाशिक व जळगाव विभागातील २२ महाविद्यालयांमधील १८८ विद्यार्थी संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच विविध क्षेत्रातील १३ परीक्षकांनी विद्यार्थ्याच्या संशोधन पोस्टर्स आणि प्रकल्पाचे बारकाईने मूल्यांकन केले.
निवड झालेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील विद्यापीठस्तरीय फेरीसाठी पात्रता मिळाली असून त्यांच्या संशोधन प्रवासाला नवी दिशा मिळणार असल्याचे विभागीय समन्वयक डॉ. आर. डी. अमृतकर व एस. एस. राऊत यांनी सांगितले. स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, समन्वयक डॉ. एन. एस. पाटील, प्राचार्य डॉ. के. एस. साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed.