NGN News
Latest Marathi News

आदी घटकर्णा ट्रस्ट – जनसेवा प्रतिष्ठानतर्फे ग्रामीण भागात ब्लॅंकेट वाटप

** राहुल सुराणा

घोटी : एनजीएन न्यूज नेटवर्क

आदी घटकर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी माता बहिणींना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. तारांगण पाडा, माणिकखांब, खडकवाडी, खंबालेवाडी, वाकी,वाळविहीर,इगतपुरी गावठा येथील ५०० कुटुंबाना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट व खजुर पॅकेटचे वाटप खंबाळे ता. इगतपुरी येथे करण्यात आले.

याप्रसंगी आदी घटकर्णा ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष मनोज शहा,मुकुंदभाई गंगर,उदयभाई शहा, नितीन भाई कोठारी,हेमंत सुराणा,आण्णा पवार,संदिप बकरे, दत्ताजी शिंदे,सागर बापट, श्री.जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, आदिवासी नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष नीता वारघडे, सोनीताई दोरे, जयाताई भगत, शालेय पोषण आहार संघटनेचे सचिव संतोष भगत, जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य गजानन गोफने सर, अजय पुरोहित,मुकुंदभाऊ बोरकर, सुधीर कांबळे, जालिंदर मानवडे,बबन कदम,दामु माळी,भास्कर भगत,काशिनाथ गावीत आदी उपस्थित होते.

गत ६ वर्षापासून इगतपुरी तालुक्यात दुर्गम भागात हिवाळ्यात उबदार कपडे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येत आहे अशी माहिती श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीचे अध्यक्ष श्री किरण फलटणकर यांनी दिली.

Comments are closed.