वनश्री राम सुरसे वावी यांच्या चंदन शेतीस भेट
वावी / संतोष बिरे
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सिन्नर तालुक्यातील वावी येथे सद्गुरु गंगागिरी महाराज व वै. रामगिरी महाराज वावीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शुक्रवार दि. 12 रोजी महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. व्यासपीठावर गणेशानंद महाराज, रमेशगिरी महाराज, भोलेगिरी महाराज, डॉ. सुमाष महाराज गेठे, हेमंत गोडसे,ह.भ.प.पांडुरंग महाराज गीरी,विजय काटे सरपंच वावी आदि मान्यवर उपस्थित होते
सप्ताह उद्धघाटन व प्रवचन समारोपानंतर वनश्री राम सुरसे वावी यांचे उजणी येथील चंदन शेतीस भेट देण्याची इच्छा महंत नामदेव शास्ञी यांनी सप्ताह आयोजक ह.भ.प.पांडुरंग महाराज गिरी यांचेकडे व्यक्त केली. शास्ञी महाराज आपले शेतीस भेट देणार म्हटलेनंतर राम सुरसे यांनीही लागलीच होकार देत महाराज यांनी राम यांचे चंदन, मिलियाडुबा व डाळिंब शेतात सुमारे दोन तासाचा अवधी देत सदर शेतीचे सर्व बारकावे जाणून घेतले.चंदन लागवड कशी करावी, यजमान वृक्ष कुठला असावा, पाणी व खत व्यवस्थापन, पिक काढणी अवस्था, सदर पिकातील संभाव्य धोके, विक्री व्यवस्था, संरक्षण प्रणाली, चंदनाचे लाकडाचे व सुगंधी तेलाचे फायदे, पिकाचे आर्थिक उत्पन्न आदी बाबींचे महाराचांचे प्रश्नावलींची अचूक माहीती राम सुरसे यांनी दिली.राम यांचे या अभिनव प्रयोगाचे महंतांनी कौतूक व अभिनंदन केले. प्रसंगी विमल सुरसे, शरद सुरसे,विजय काटे सरपंच वावी, कैलाश जाजू उपसरपंच वावी, शंकर राजेभोसले,योगेश ताजणे,अजिंक्य जोशी, कौशिक सोमाणी, दिपक सोनवणे,सचिन देसाई, मोना काटे, बाळासाहेब काकड आदी उपस्थित होते.
—–
@ चंदन हा विषय ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापुर्वी ज्ञानेश्वरीत लिहीलेला आहे. त्यावरती मी किर्तन व प्रवचण देखील केलेली आहे. चंदनास हिंन्दु धर्मात अनंन्यसाधारण असे महत्व आहे. चंदन शेती प्रत्यक्ष बघणेचा माझा माणस होता.आपण शेतीचे सुंदर नियोजन करूण चंदन, मिलियाडुबा, डाळींब व विविध झाडांची लागवड करूण परीसर छान बनविलेला आहे.आपले चंदन शेतास भेट दिलेनंतर मला चंदन पिकाचे अनेक बाबींचा उलगडा झाला व समाधान वाटले.
– प.पु.न्यायाचार्य, ह.भ.प.महंत श्री.नामदेव महाराज शास्ञी, भगवानगड
Comments are closed.