- उबाठा शिवसेना आमदार अनिल परब यांचा धक्कादायक आरोप
- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी गेल्याचीही माहिती
नागपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क
परिवहन विभागामध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर असलेल्या भरत कळसकर यांनी ३३१ अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये मागितल्याचा धक्कादायक आरोप उबाठा शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. यापैकी २४५ अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहितीही त्यांनी दिली.
परब म्हणाले, कळसकर यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असून या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी केला. बदलीच्या पैशांतील पहिली रक्कम दहा लाख स्वरुपात मागितली गेली. आतापर्यंत आपण ६०० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा दावा करणारा हा अधिकारी, माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे असे तो सांगतोय. मग हे ब्रह्मास्त्र कोण, याची माहिती समोर आणा अशी मागणी परब यांनी केली. या अधिकाऱ्याने मेसर्स आणि अशा नावाच्या काही शेल कंपन्या बनवल्या आहेत. फक्त रजिस्टर केलेल्या तीन कंपन्या आहेत. या कंपन्यांचे व्यवहार झालेले नाहीत, मग पैसे आले कुठून? हे काळे पैसे शेल कंपनीत टाकून बाहेर येतात असा दावा अनिल परब यांनी केला. या अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहात, असा सवाल परब यांनी सरकारला केला.
Comments are closed.