- 50 हजार रुपये दंडात्मक कारवाईचा इशारा
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कलम 4 अन्वये ज्या कार्यालयांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी. शासनाच्या निर्देशानुसार या समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
अंतर्गत समितीच्या SHE BOX PORTAL वर नोंदणीसाठी http://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर अथवा खाली दिलेल्या QR कोड स्कॅन करावा. त्यानंतर लॉगइन करून SHE BOX LINK उघडावी. होम पेजवर प्रायव्हेट हेड ऑफीसवर क्लिक करावे. Register -Proceed- करून फॉर्म भरून सबमिट करावा.
आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन केली नसल्यास तत्काळ समिती स्थापन करून QR कोडवर माहिती भरावी अन्यथा रक्कम रू 50 हजार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. दुसाणे यांनी कळविले आहे.
Comments are closed.