NGN News
Latest Marathi News

गोदामाई प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सृष्टी देव यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार

  • गोदावरी स्वच्छता अभियानाची दखल; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारत सरकार प्रमाणित राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार येथील गोदामाई प्रतिष्ठानच्या जिल्हा कार्याध्यक्ष सृष्टी देव यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.

नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषित पाणी नदीत मिसळण्यात येत असल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून येते. नदीच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येते. आजवर १६८ वेळा हे अभियान सृष्टी देव यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आले आहे. याचीच दखल घेवून त्यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गोदा प्रदूषणमुक्तीचा हा लढा यापुढेही अव्याहत सुरु ठेवण्याचा निर्धार सृष्टी देव यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या पुरस्कार प्राप्तीबद्दल त्यांच्यावर विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.