NGN News
Latest Marathi News

बाराव्या काकासाहेब वाघ स्मृती चषक स्पर्धेचे शुक्रवारपासून आयोजन

  • ३० डिसेंबरपर्यंत स्पर्धा चालणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

के के वाघ शिक्षण संस्था, के के वाघ फाउंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ सालच्या  क. का. वाघ स्मृती चषक अर्थात पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार आहेत. 

नाशिक जिल्ह्या व निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नर व येवला या तालुक्यांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे १२ वे वर्ष होय. 

दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी के के वाघ विद्याभवन, भाऊसाहेबनगर येथे  सकाळी ९ वाजता संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य बाळासाहेब वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. दि. १३ डिसेंबर रोजी उद्घाटन स्थळी मुलांसाठी क्रिकेटने स्पर्धेचा  शुभारंभ होईल. 

दिनांक १४ डिसेंबर रोजी  के के वाघ काकासाहेब नगर कॅम्पस, ता. निफाड येथे मुला व मुलींसाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय,नाशिक येथे दिनांक १५ ते १६ डिसेंबर रोजी दरम्यान मुले व मुलींसाठी फुटबाॅल स्पर्धा होईल. मुले व मुलींसाठी रस्सीखेच स्पर्धा दिनांक १९ डिसेंबर रोजी के के वाघ सरस्वतीनगर कॅम्पस येथे पार पडेल.दिनांक २० डिसेंबर रोजी के के वाघ फार्मसी महाविद्यालय,पिंपळस(रामाचे) येथे कुस्ती खेळविल्या जातीलके के वाघ युनिव्हर्सल स्कूल, डीजीपीनगर, नाशिक येथे दिनांक  २१ डिसेंबर रोजी मुले व मुलींसाठी  बुद्धिबळ स्पर्धा तर दिनांक  २४ डिसेंबर रोजी  मुले व मुलींसाठी  योगासने स्पर्धा होणार आहे. तसेच

 मिनाताई ठाकरे स्टोडियम नाशिक येथे मुला व मुलींसाठी स्क्व्वॅश स्पर्धा आयोजित केली आहे.मल्लखांब स्पर्धा दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी के के वाघ कृषी महाविद्यालय, सरस्वतीनगर येथे होईल. 

मुला व मुलींसाठी खो-खो स्पर्धा दिनांक २७ डिसेंबर रोजी तर मुला व मुलींसाठी व्हाॅलीबाॅल स्पर्धा  दिनांक २८ डिसेंबर रोजी के के वाघ वरिष्ठ महाविद्यालय,चांदोरी येथे होतील.दिनांक ३० डिसेंबर रोजी के के वाघ विद्याभवन, भाऊसाहेब नगर येथे बक्षीस वितरण समारंभाने स्पर्धेची सांगता होईल.या पार पडणा-या विविध स्पर्धांसाठी वैयक्तिक व संघीय गटात रुपये ५०० पासून ते ३१००० पर्यंत बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. तरी नाशिक जिल्हातील विविध शाळा व महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी स्पर्धात सहभागी व्हावे असे आवाहन के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ व जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ यांनी केले आहे. 

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी ज्या-त्या शाळा व महाविद्यालयाशी संपर्क साधावा तसेच स्पर्धेबाबत अधिक माहिती व प्रवेश नोंदणीसाठी सुनिल निरगुडे (९३२६८९५५६५) व सारंग नाईक (९९२३३३२९५० ) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे. 

Comments are closed.