NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आनंद महोत्सव साजरा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री डॉ.अगस्टीन पिंटो सर व संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे दि. 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगर, सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिडके कॉलनी व रायन इंटरनॅशनल स्कूल डीजीपी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रायन इंटरनॅशनल स्कूल डीजीपी नगर येथे विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी नृत्य, गायन, वादन यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच यात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे ही आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रकारचे स्टॉल्स विद्यार्थ्यांसाठी होते. टॅटू काढणे, कागदापासून विविध कलात्मक डिझाईन तयार करणे, चित्रकला, रंगकाम तसेच खाण्यासाठी विविध वस्तूंचेही आयोजन करण्यात आले होते. यात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात येत होते. या सर्व स्पर्धांचा खेळांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

वैयक्तिक नृत्य स्पर्धेत सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरच्या आरोही वाघ हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच बासरी वादन स्पर्धेत सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरच्या साई पगारे आणि प्रथम क्रमांक पटकावला. समूह नृत्य स्पर्धेत सुद्धा सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरच्या इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रथम स्थान अबाधित राखले. हा महोत्सव बघण्यासाठी तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांनी सुद्धा गर्दी केली होती. त्यांनीही आनंद महोत्सवाचा आनंद लुटला. आनंद महोत्सवाचे 30 नोव्हेंबर रोजी समारोप झाला.
या आनंद महोत्सवाच्या आयोजनासाठी सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगर च्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे, विभाग प्रमुख शितल चिंचोलीकर व इतर शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले

Comments are closed.