NGN News
Latest Marathi News

न्‍यूट्रिशनिस्‍ट लीमा महाजन यांच्याकडून पाम तेल लेबल्‍सबाबत मिथक दूर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 ग्राहकांमध्‍ये खाद्यतेलांबाबत वाढता गोंधळ आणि ऑनलाइन प्रसारित होणारी चुकीची माहिती पाहता मलेशियन पाम ऑईल कौन्सिल (एमपीओसी)ने नवीन सहा एपिसोड्सची पॉडकास्‍ट सिरीज लाँच केली आहे. या सिरीजचा भारतातील कुटुंबांना माहितीपूर्ण, विज्ञानाचे पाठबळ असलेल्‍या पर्यायांची निवड करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे. ही सिरीज एमपीओसीच्‍या यापूर्वीच्‍या डिजिटल उपक्रमांवर आधारित आहे, ज्‍यांनी भारतातील लाखो ग्राहकांपर्यत पोहोचत मलेशियन पाम तेलामधील पोषण, विज्ञान व शाश्वतता सोपी करून दिली आहे.

सिरीजमधील पहिल्‍या दोन पॉडकास्‍ट एपिसोड्समध्‍ये अतिथी म्‍हणून पोषण तज्ञ व क्रिएटर लीमा महाजन यांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. पॉडकास्‍टमध्‍ये किचनबाबत विश्वसनीय चर्चांसोबत आरोग्‍य, डाएटरी फॅट्स, शाश्वतता आणि दिशाभूल करणाऱ्या मार्केटिंग लेबल्‍सबाबत पुरावा-आधारित माहिती सादर केली जाते. प्रत्‍येक एपिसोड मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेल्‍या मिथकांना दूर करतो आणि श्रोत्‍यांना दैनंदिन कूकिंगसाठी स्‍पष्‍ट व व्‍यावहारिक मार्गदर्शन करतो.

एपिसोडचे मुख्‍य आकर्षण

पहिल्‍या एपिसोडमध्‍ये लीमा सर्वात मोठा प्रश्‍न ‘कोणते तेल खरंच आरोग्‍यदायी आहे?’बाबत सोपे स्‍पष्‍टीकरण देतात, जेथे कोणतेही तेल पूर्णपणे वगळण्‍यापेक्षा संतुलित व स्‍मार्ट कूकिंग सवयींवर भर देतात. त्‍या पाम तेलाचे विज्ञान-समर्थित फायदे आणि घरामध्‍ये तेल बदलत राहण्‍याचे महत्त्व सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट करतात. दुसऱ्या एपिसोडमध्‍ये, त्‍या वाढत्‍या ‘नो पाम ऑईल’ लेबल्‍सबाबत सांगतात, जेथे असे लेबल्‍स भीतीचे वातावरण आणि दिशाभूल करणारे का असतात याबाबत स्‍पष्‍टीकरण देतात. त्‍या प्रेक्षकांना पॅकेटवर पुढील बाजूस असलेले दावे पाहण्‍याचे आणि उत्‍पादनाला आरोग्‍यदायी ठरवणाऱ्या बाबी समजून घेण्‍याचे आवाहन करतात.

पाम तेलाबाबत विज्ञानाचे मत

या सिरीजमध्‍ये विद्यमान संशोधनाला एकीकृत करण्‍यात आले आहे. या संशोधनामधून निदर्शनास येते की, पाम तेलामध्‍ये टोकोट्रिएनॉल्‍स व कॅरोटेनॉइड्स संपन्‍न प्रमाणात असतात (लाल पाम तेलात). ही संयुगे अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट व संभाव्‍य कार्डिओमेटाबोलिक फायदे देतात. पाम तेल कोलेस्‍ट्रॉल-मुक्‍त आहे, जेथे कोलेस्‍ट्रॉल फक्‍त पशु-आधारित फॅट्समध्‍ये आढळून येते. संतुलित आहाराचा भाग म्हणून सेवन केल्‍यास पाम तेलाचा रक्‍तातील कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर अनुकूल परिणाम होतो. 

आयसीएमआर आहारसंबंधित मार्गदर्शकतत्त्वांशी संलग्‍न

पॉडकास्‍ट आयसीएमआर-एनआयएन डाएटरी गाइडलान्‍स (२०२४)शी संलग्‍न आहे, जे प्रत्‍येक व्‍यक्‍तीने दररोज २५ ते ३० ग्रॅम फॅट्सचे सेवन मर्यादित ठेवण्‍याची आणि संतुलित फॅटी अ‍ॅसिड प्रोफाइल राखण्‍यासाठी विविध वनस्‍पती-आधारित तेलांमध्‍ये बदल करण्‍याची शिफारस करते. यासंदर्भात, पाम तेल भारतीयांच्‍या कूकिंग पद्धतींसाठी अनूकूल असलेल्‍या विविध आरोग्‍यदायी पर्यायांपैकी एक आहे.  

भारताच्‍या खाद्यतेल ध्‍येयांना पाठिंबा: एनएमईओ-ओपी

ही सिरीज भारतातील विस्‍तृत खाद्यतेल क्षेत्रामध्‍ये पाम तेलाचे महत्त्व देखील सादर करते. भारत सरकारच्‍या नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑईल्‍स – ऑईल पाम (एनएमईओ-ओपी) अंतर्गत देशभरातील राज्‍यांमध्‍ये पाम तेल लागवडीचा विस्‍तार केला जात आहे, ज्‍यामुळे पाम तेलाची देशांतर्गत उपलब्‍धता वाढेल आणि पाम तेल आयात करण्‍यावरील अवलंबन कमी होईल. मलेशियन तज्ञ विविध प्रांतांमध्‍ये या विकासाला पाठिंबा देत आहेत.

दिशाभूल करणाऱ्या ‘नो पाम ऑईल’ लेबल्‍सचे निराकरण

बाजारपेठेत वाढत असलेल्‍या गोंधळासंदर्भात पॉडकास्‍टने आयएफबीए व ओटीएआय सारख्‍या उद्योग संस्‍थांनी नुकतेच केलेल्‍या विधानांना अधिक दृढ केले आहे, ज्‍यांनी ‘नो पाम ऑईल’ टॅग्‍जना आरोग्‍याला अनुकूल पुरावा-आधारित दाव्‍यांपेक्षा दिशाभूल करणारे मार्केटिंग धोरण म्‍हणून लेबल‍ केले आहे. ही सिरीज ग्राहकांना भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या संदेशापेक्षा एकूण पोषण, संयम आणि विश्वसनीय विज्ञानाला प्राधान्‍य देण्‍याचे आवाहन करते.

वैज्ञानिक तथ्‍यांच्‍या माध्‍यमातून एमपीओसीचा सुस्‍पष्‍टता, संदर्भ व अचूकता आणत ग्राहकांना योग्‍य व संतुलित निवड करण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.

पहिल्‍या एपिसोडची लिंक: https://www.instagram.com/p/DQMimjLD3Uq/

दुसऱ्या एपिसोडची लिंक: https://www.instagram.com/reel/DRCrejij7Hi/?igsh=dHNsYXlmemx5bjcx

सिरीज बाबत

मलेशियन पाम ऑईल कौन्सिल (एमपीओसी)ची ही सहा एपिसोड्सची पॉडकास्‍ट सिरीज चुकीच्‍या माहितीचे निराकरण करण्‍यासाठी आणि पाम तेलाबाबत वैज्ञानिक तथ्‍ये सोप्‍या, विश्वसनीय पद्धतीने सांगण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये पोषण, आरोग्‍य व शाश्वतता यांसारख्‍या विषयांबाबत तज्ञांचे मत व दैनंदिन पैलू सादर करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे श्रोत्‍यांचा मिथकांबाबत असलेला समज दूर करण्‍यास मदत होते. या चर्चांसह एमपीओसीला संतुलित, तथ्‍य-आधारित चर्चांना चालना देण्‍याची आणि वैविध्‍यपूर्ण, पौष्टिक व शाश्वतपणे उत्‍पादित करता येणारे खाद्यतेल म्‍हणून पाम तेलाचा योग्‍य दर्जा निदर्शनास आणण्‍याची आशा आहे.        

Comments are closed.