NGN News
Latest Marathi News

महात्मा ज्योतिबा फुले एक महान समाजसुधारक होते- प्राचार्य डॉ. पवार

** अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असे महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान असे समाजसुधारक होते.समाजातील सर्व स्तरातील जातीय भेदभाव आणि विषमता दूर करण्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे मत प्राचार्य डॉ.लहू पवार यांनी व्यक्त केले.

पिंपळनेर येथील कर्मवीर आ.मा.पाटील कला,वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय तोरवणे, डॉ.नितीन सोनवणे, आयक्यूएसी संयोजक डॉ.एस.पी खोडके,डॉ.एम. व्ही.बळसाने, प्रा.डी.बी. जाधव,प्रा.हितेश वानखेडे, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.लहू पवार पुढे म्हणाले की ज्योतिराव फुले यांनी केलेल्या सर्वसाधारण, गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठीच्या कार्यामुळे ते महात्मा झाले.त्यांनी विशेषतःस्त्री शिक्षणा बाबत व प्रौढ शिक्षणाबाबत अधिक जागृती केली. देशातील प्रत्येक व्यक्ती साक्षर झाला पाहिजे यासाठी त्यांनी आपले कार्य केले.महात्मा जोतिबा फुले हे एक उत्तम असे लेखक होते. त्यांनी ‘गुलामगिरी’ सारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले.तसेच स्थापत्य क्षेत्रात देखील त्यांनी उत्तम कार्य केले आहे. शिक्षणाचे महत्व ओळखून सावित्रीबाई फुले यांच्या सोबत या दांपत्याने स्त्री शिक्षणासाठी 1948 ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्याकाळात पालकांचा विश्वास संपादन करत, खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाबाबत जागृती निर्माण केली आणि तेव्हापासून, शिक्षण घेण्यासाठी त्यांचे आई वडील निःशंक:पणे मुलींना शाळेत पाठवायला लागले. याचे खरे श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांनाच जाते असे विचार प्राचार्य पवार यांनी ज्योतिरावांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.संजय तोरवणे यांनी केले. आभार डॉ.नितीन सोनवणे यांनी मानले.

Comments are closed.