NGN News
Latest Marathi News

डीएसपी म्युच्युअल फंडतर्फे गुंतवणूकदारांसाठी चार योजनांचा शुभारंभ

  • डीएसपी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स, ईटीएफ, डीएसपी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंडासह ईटीएफ योजना सादर
  • गुंतवणूकदारांना अल्प खर्चात गुंतवणूकीची सोपी संधी प्रदान

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

डीएसपी म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांसाठी आज चार नवीन पॅसिव्ह फंड योजना आणल्या आहेत. डीएसपी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड, डीएसपी निफ्टी मिडकॅप १५० ईटीएफ फंड, डीएसपी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ फंड अशा या चार योजना आहेत.* या नव्या योजनांच्या शुभारंभामुळे पॅसिव्ह अर्थात अप्रत्यक्ष गुंतवणूक प्रकारात डीएसपीच्या गुंतवणूक योजनांचे विश्व आणखी विस्तारले आहे. मिड-आणि स्मॉलकॅप गटातील कंपन्यांच्या रुपाने भारतातील उद्योगविश्वाचे व्यापक स्वरुपात चित्र उलगडते, तसेच गतिमान कॉर्पोरेट विश्वाचे ते एकत्रित प्रतिनिधित्वही करतात. त्यामुळे या फंडांच्या रुपाने मिड-आणि स्मॉल-कॅप गटातील कंपन्यांमध्ये नियमांवर आधारित निर्देशांकाच्यामाध्यमातून अल्प खर्चात गुंतवणूकीची संधी गुंतवणूकदारांना प्राप्त झालेली आहे.

निफ्टी ५०० निर्देशांकातील १०१ ते २५० या क्रमांकादरम्यान असलेल्या कंपन्यांचा निफ्टी मिडकॅप १५० निर्देशांकात समावेश आहे, तर निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांकात निफ्टी ५०० मधील २५१ ते ५०० क्रमांकादरम्यानच्या कंपन्यांचा समावेश आहे. या दोन्ही निर्देशांकांनी संपुर्ण शेअरबाजाराच्या तुलनेत दीर्घकालात उत्तम परतावा प्रदान केलेला आहे, हे आकडेवारीतून सिध्द झालेले आहे. निर्देशांकाच्या ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या वाटचालीचे केलेल्या विश्लेषणानुसार गत दहा वर्षांच्या कालावधीत निफ्टी मिडकॅप १५० टीआरआयने निर्देशांकाने सरासरी १६.२ टक्के दराने सरासरी वार्षिक (रोलिंग) परतावा दिला आहे आणि तो निफ्टी ५०० टीआरआयच्या १२.६ टक्क्यांच्या परताव्यापेक्षा खूपच जास्त आहे. स्मॉल-कॅप निर्देशांकाने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. निफ्टी ५०० टीआरआयच्या १२.६ टक्क्यांच्या तुलनेत निफ्टी स्मॉलकॅप २५० टीआरआयने दहा वर्षात सरासरी १३.५ टक्क्यांनी रोलिंग परतावा दिलेला आहे. संपुर्ण बाजारासाठीच्या निर्देशांकांच्या तुलनेत दोन्ही निर्देशांकांमध्ये अधिक घसरण होऊ शकते; तथापि, गुंतवणूक धारणेचा कालावधी वाढल्यास दोन्ही निर्देशांकातील नकारात्मक परताव्यांची शक्यता कमी होते**

लार्ज-कॅप कंपन्यांचा फारसा सहभाग नसलेली क्षेत्रे तसेच उद्योग यांचे प्रतिनिधीत्व प्रामुख्याने हे दोन्ही निर्देशांक करतात. स्मॉलकॅप २५० निर्देशांकात मुख्यतः भांडवली बाजार, औद्योगिक उत्पादने, आरोग्यसेवा उपकरणे, बांधकाम साहित्य, कापड आणि इतर विशिष्ट विभागांतील कंपन्यांना स्थान देण्यात आलेले आहे. हे निर्देशांक या अनेक विभागातील आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करतात. आघाडीच्या २५० कंपन्यांव्यतिरिक्त झपाट्याने उदयास येत असलेल्या कंपन्यांचे विश्व किती विस्तृत आहे, ही बाब हा निर्देशांक अधोरेखित करतो. तर, मिडकॅप १५० हा निर्देशांक एकूण स्मॉल-कॅप विश्वाच्या तुलनेत याच विश्वातील आघाडीच्या दिडशे कंपन्यांच्या रुपाने कमाईच्या बाबतीत अधिक स्थिर चित्र गुंतवणूकदारांना प्रदान करतो. तसेच बाजारात व्यापक प्रमाणात गुंतवणूकीमध्ये लक्षणीय प्रमाणात असलेल्या संधी दर्शवितो.

अँक्टीव्ह गटातील फंडांच्या गुंतवणूकीच्या पध्दतीचा विचार करता हे दोन्ही निर्देशांक आपापल्या गटातील कंपन्यांवरच केंद्रीत झालेले असल्याने गुंतवणूकीत भौतिकदृष्ट्या भिन्नता मिळते आणि गुंतवणूकीत सरमिसळ टाळतात. मिडकॅप १५० निर्देशांकाची अँक्टीव्ह स्वरुपातील फंडांशी गुंतवणूकीत फक्त ३२ टक्के सरमिसळ झालेली आहे,  तर स्मॉलकॅप २५० निर्देशांकामध्ये अँक्टीव्ह स्मॉलकॅप फंडांच्या पोर्टफोलिओसह १८ टक्के सरमिसळ झालेली आहे. या भिन्न संरचनेमुळे निर्देशांक-आधारित गुंतवणूक अँक्टीव्ह फंडाच्या गुंतवणूक धोरणांसोबत पूरक त्याचबरोबर वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट (बिल्डिंग ब्लॉक) अशी गुंतवणूक म्हणून काम करू शकते, ही हमी मिळते.  

नवीन फंड ऑफर (एनएफओ) २४ नोव्हेंबर ते ०८ डिसेंबर २०२५ या कालावधीदरम्यान खुली राहणार आहे.

“भारतात नवनवीन आविष्कार आणि वाढ या दोघांचा मिलाफ घडवून आणणाऱ्या चौकटीत मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचा समावेश होतो. समभाग निवडीऐवजी शिस्तबद्ध, नियम-आधारित गुंतवणूक केल्यास ऐतिहासिकदृष्ट्या गुंतवणूकदारांना बाजाराच्या विविध चढउतारांदरम्यान अधिक फायदा झालेला आहे, हे आमच्या संशोधनातून सिध्द झालेले आहे. हा फंडरुपी गुंतवणूक पर्याय गुंतवणूकदारांना व्यापक प्रमाणात विस्तारलेल्या बाजारपेठेत सहभागी होण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करतो,” असा विश्वास डीएसपी म्युच्युअल फंडचे सीएफए आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रॉडक्ट्स विभागाचे प्रमुख अनिल घेलानी यांनी व्यक्त केला.

Comments are closed.