NGN News
Latest Marathi News

गोदा श्रध्दा फाउंडेशनच्या ‘सांज पाडवा’चे  रौप्यमहोत्सवी वर्ष उत्साहात

दिग्गज कलाकारांनी नाशिककरांना मंत्रमुग्ध केले

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 नाशिककरांना दिवाळीमध्ये सुरांची मेजवानी देणाऱ्या  गोदा श्रध्दा फाउंडेशन आयोजित ‘सांजपाडवा’  या कार्यक्रमाने नाशिककरांना मंत्रमुग्ध केले. हे वर्ष या कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून , २५ वर्षांपूर्वी श्री. सुरेश अण्णाजी पाटील व गोदा श्रध्दा फाउंडेशन परिवाराने कॉलेजरोड  परिसरात सुरु केलेल्या सांजपाडव्याच्या  या संगीत पर्वाने नाशिककरांना आजपर्यंत संगीत व  गायकी सोबतच अनेक दिग्गज कलाकारांना प्रत्यक्षात ऐकण्याची संधी दिली आहे.  यावर्षी या  कार्यक्रमाचे २५ वे पुष्प गुंफताना बॉईज टाउन संकुल ग्राउंड येथे इंडियन आयडॉल फेम व प्रख्यात संगीतकार अजय –अतुल यांचे सहकारी गायक प्रतिक सोळसे, जगदीश चव्हाण, श्वेता दांडेकर ,भाग्यश्री टिकले या दिग्गज कलाकारांनी नाशिककरांना मंत्रमुग्ध केले.

देवा श्री गणेशा या गाण्याने जगदीश चव्हाण यांनी कार्यक्रमाची सुरुवात करत उत्तरोत्तर एकापेक्षा एक सदाबहार गाण्यांचे सादरीकरण केले. श्वेतादांडेकर यांनी ‘अयगिरी नंदिनी’ हे गीत तसेच अस्सल मराठमोळ्या बाजात ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा, ‘सैराट’ आदी गाण्यांवर रसिकांना थिरकायला लावले. प्रतिक सोळसे यांच्या ‘पावले चालती पंढरीची वाट’, ‘सासोंकी माला’,तेरे बिन दिल इ गाण्यांनी कार्यक्रम वरच्या उंचीवर नेला. भाग्यश्री टिकले यांनी नाशिकातील काळाराम मंदिराला स्मरून ‘श्रीराम जानकी ‘ तसेच ‘जीव रंगला’, अधीर मन झाले  ही अजय-अतुल यांची गाजलेली गाणी सादर केली. कार्यक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्योग, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, प्रशासनिक व राजकीय या क्षेत्रातील अनेक मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यानेआणि श्रीरामांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.याप्रसंगी बोलताना गोदा श्रद्धा फाउंडेशनचे संस्थापक सुरेश अण्णाजी पाटील म्हणाले की नाशिकला सांस्कृतिक वारसा लाभला असून नाशिककर हे कलेला दाद देणारे आहेत. कार्यक्रमात दरवर्षी अनेक नामवंत कलाकार येत असल्याने नाशिककर या सांज पाडव्याची आतुरतेने वाट बघत असतात असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास खासदार डॉ.शोभाताई बच्छाव ,डॉ.दिनेश बच्छाव ,डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी ,जेष्ठ नेते  लक्ष्मणराव सावजी,एकनाथजी शेटे,भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, ऍड. नितीनजी ठाकरे, म्हाडा चे सभापती रंजन ठाकरे, माजी आमदार नितीन भोसले, माजी नगरसेवक दत्ताजी पाटील,अरुण काळे,सुनील खोडे,स्वाती भामरे,यशवंत निकुळे,,सी ए राजराम बस्ते,वसंतराव खैरनार,प्रकाश चौधरी , आयमाचे अध्यक्ष ललित बूब ,क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर ,माजी अध्यक्ष उमेश वानखेडे, तुषार संकलेचा ,मॅनेजिंग कमिटी सदस्य सागर शहा, इ .उद्योग, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, प्रशासनिक व राजकीय या क्षेत्रातील मान्यवरांची  उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदा श्रद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश अण्णाजी पाटील यांनी केले.सूत्रसंचालन परेश दाभोळकर तर आभार प्रदर्शन आर्किटेक्ट कृणाल पाटील यांनी केले.

Comments are closed.