NGN News
Latest Marathi News

राजवाडे टोळीवर हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणीचा गुन्हा दाखल

बारा जणांवर गुन्हा; पाच संशयिताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंचवटी परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाकडे मोफत मद्य आणि खंडणी मागितल्याप्रकरणी मामा राजवाडे आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पाच संशयिताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजवाडे यास याआधीच दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

वीसे मळा गोळीबर प्रकरणात अजय बागुल आणि मामा राजवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता राजवाडे याच्या टोळीचा कारनामा उघड झाल्याने त्याचा पाय अधिक खोलात गेल्याचे मानले जात आहे. पंचवटी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करताना राजवाडे याचाही संशयित म्हणून सहभाग नोंदवला आहे. राह्वाडे याच्यासह त्याच्या साथीदारांनी गेल्या फेब्रुवारी २०२५ मध्ये हॉटेल न्यू पंजाब रेस्टॉरंट येथे जावून चालकाकडे ५० हजारांची खंडणी मागितली होती. नकार मिळाल्यानंतर संशयितांनी हॉटेल तोडफोडीची धमकी दिली होती. त्याच दिवशी रात्री संबंधित टोळीतील काहींनी फुकट मद्याची मागणी करीत हॉटेल व्यवसायिकाला धमकावले होते. राजवाडे टोळीच्या दहशतीमुळे आपण पोलिसात जाण्यास कचरत असल्याचे हॉटेल चालकाने स्पष्ट केले. तक्रारीवरून राजवाडे याच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.