NGN News
Latest Marathi News

आयोडीन कमतरता दिन पूर्वसंध्येला आयोडीनबाबत जनजागृती नेतृत्व टाटा सॉल्टकडे

  • महत्त्वपूर्ण सूक्ष्म पोषक घटक म्हणून आयोडीनच्या आवश्यकतेवर भर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

यंदाच्या जागतिक आयोडीन कमतरता दिनाच्या निमित्ताने, भारतातील आयोडीनयुक्त मिठाचा अग्रदूत आणि बाजारातील आघाडीचा ब्रँड टाटा सॉल्टने देशभरातील मुलांमधील आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांविरुद्ध (आयडीडी) लढा देण्याची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. देशातील पहिले राष्ट्रीय पातळीवरचे आयोडीनयुक्त मीठ म्हणून, टाटा सॉल्ट हा ब्रॅंड लोकांमध्ये आयोडीन या सूक्ष्म पण अत्यावश्यक पोषक घटकाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. विशेषतः बाल्यावस्थेतील बौद्धिक विकासासाठी आयोडीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने टाटा सॉल्टचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.

आयोडीनयुक्त मीठ हे फक्त सरकारने अनिवार्य केलेला पूरक आहार नसून, तो आपल्या स्वयंपाकघरातील एक साधा घटक आहे. मीठ आपल्या अन्नाला केवळ चव देत नाही, तर आपल्या आरोग्याचेही अनेक प्रकारे संरक्षण करते. मीठ हे सर्वत्र वापरले जाणारे उत्पादन असल्यामुळे, त्याद्वारे आयोडीनचा पुरवठा करणे ही सर्वात प्रभावी पद्धत ठरली आहे. युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायझेशन या कार्यक्रमाद्वारे जगभर आयोडीन अभावजन्य आजार (आयडीडी) रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मीठ हे सार्वजनिक आरोग्य मोहिमांचे प्रमुख साधन राहिले आहे. त्यामुळे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे गंभीर परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.

भारतानेही या क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. २०१८–१९ मध्ये घेण्यात आलेल्या इंडिया आयोडीन सर्व्हेनुसार, देशातील सुमारे ७६.३ टक्के घरांमध्ये किमान १५ पार्ट्स पर मिलियन (पीपीएम) आयोडीन असलेले पुरेसे आयोडीनयुक्त मीठ वापरले जाते. मात्र, या सर्वेक्षणात हेही आढळले की फक्त २२.४ टक्के लोकांना आयोडीनयुक्त मीठाचे फायदे अचूकपणे माहीत आहेत, तर ६१.४ टक्के लोकांना इतकेच ठाऊक आहे की योग्य प्रमाणातील आयोडीन सेवनामुळे गॉईटर हा आजार टाळता येतो.

टाटा सॉल्टचा ‘नमक हो टाटा का… टाटा नमक’ हा ऑडिओ-आधारित प्रचार आता ‘भारताच्या हृदयात’ अधिक खोलवर पोहोचतो आहे. डिजिटल आणि टेलिव्हिजन माध्यमांमधील यशस्वी उपस्थितीनंतर, या ब्रँडने आता ग्रामीण आणि निमशहरी भारतात आपला विस्तार सुरू केला आहे. प्रमुख वाहतूक केंद्रांवर वारंवार ऑडिओ संदेश प्रसारित करून हा उपक्रम राबवला जात आहे. संस्कृतीशी असलेली जवळीक आणि राष्ट्रीय उद्दिष्टांची भावना या जाहिरात मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. या जाहिरात मोहिमेद्वारे मुलांच्या बौद्धिक विकासात पुरेशा आयोडीनच्या सेवनाची भूमिका किती महत्त्वाची आहे, आणि त्याचा परिणाम देशाच्या दीर्घकालीन प्रगतीवर कसा होतो, हे अधोरेखित केले जात आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, या मोहिमेतील आकर्षक जिंगल गाझियाबाद, नागपूर, दिल्ली जंक्शन यांसारख्या रेल्वे स्थानकांवर, बसस्थानकांवर, तसेच फिरत्या व्हॅनद्वारे सतत प्रसारित केली जात आहे. आता हा प्रचार पुढे मुजफ्फरपूर, पाटणा जंक्शन, हाजीपूर, आग्रा, प्रयागराज, वाराणसी, लखनौ चारबाग, इंदौर, भोपाळ, इटारसी, कटनी, सतना, नाशिक रोड, सोलापूर, खडगपूर, सानत्रागाछी, मेचेदा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी केला जात आहे. ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात पोहोचण्यासाठी, टाटा सॉल्टने महाराष्ट्र आणि राजस्थानातील प्रमुख बसस्थानकांवरदेखील ऑडिओ स्वकपात जाहिरात मोहिमा सुरू केल्या आहेत. पारंपरिक माध्यमांना जिथे पोहोचण्यात अडचण येते, तिथेही दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांपर्यंत ब्रँडचा हा संदेश थेट पोहोचत आहे.

टाटा सॉल्ट देशभरातील लोकांच्या आरोग्यवर्धनासाठी कटिबद्ध आहे — विशेषतः आयोडीनच्या कमतरतेवर मात करून आणि आयोडीनयुक्त मीठ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून भारत अधिक निरोगी करण्यासाठी हा ब्रॅंड सातत्याने प्रयत्नशील आहे.

Comments are closed.