NGN News
Latest Marathi News

‘ आयमा इंडेक्स’ 250 हून अधिक उद्योजकांचा सहभाग निश्चित

स्टॉल बुकिंगला उत्तम प्रतिसाद; अध्यक्ष ललित बुब यांची माहिती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयमा इंडेक्स महाकुंभ 2025 या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत 350 पैकी 250हून अधिक स्टॉल्सचे बुकिंग झाल्याची माहिती आयमा अध्यक्ष ललित बूब, इंडेक्सचे चेअरमन वरूण तलवार आणि बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आयमा इंडेक्समुळे उदयोन्मुख उद्योजकांना त्यांची पुढील वाटचाल अधिक सुखकर करण्यास चालना मिळेल तसेच नवीन गुंतवणुकीचा मार्ग मोठ्या प्रमाणात खुला होणार असल्याचे आयमा अध्यक्ष ललित बूब यांनी सांगितले. गुंतवणुकीबाबत देशात तसेच महाराष्ट्रात जोरदार स्पर्धा सुरू आहे.असे असले तरी नाशकात गुंतवणुकीला निश्चितच चांगला वाव मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

ब्रॅंडिंगसाठी मैलाचा दगड ठरणार

नाशिकने औद्योगिक विकास तसेच निर्यात क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यामुळे नाशिकचे चांगले ब्रॅंडिंग व्हावे तसेच नाशकात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी यादृष्टी हे प्रदर्शन म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे.हे प्रदर्शन सर्व सुविधांयुक्त, वातानुकूलित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल,अशी माहिती बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी दिली. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ,कोषाध्यक्ष गोविंद झा,सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, स्पेस कमिटी चेअरमन मनिष रावलष रावल आदी प्रयत्नशील आहेत.

Comments are closed.