नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ लेखिका , प्राध्यापक डॉ. वंदना रकिबे लिखित ‘मेनोपॉज’ या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन हॅपी हैप्पी होम प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र शिंदे गाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव श्री डी.पी. जाधव, अध्यक्ष श्री रघुनाथ बारड, महिला उपाध्यक्ष श्रीमती रीना पाटील, कार्यकारणी सभासद चिंतामण अहिरे, नाशिक विभागीय शाखेचे महासचिव दत्तू बोडके, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारताचे सचिव जगदीप कवाळ, माजी अध्यक्ष महादेव गुरव, अनुसूचित जनजाति स्त्रीरोग तज्ञ सुनिता देवरे, वनाधिकारी तृप्ती ठाकूर, सुप्रसिद्ध कवी बाळासाहेब मगर, सुभाषित प्रकाशनाचे प्रकाशक सुभाष सबनीस, तसेच प्रकल्पातील कर्मचारी व विद्यार्थी तसेच नाशिक मधील राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सामान्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. वंदना रकिबे यांनी पुस्तक लिखाणामागील कल्पना स्पष्ट केली. प्रत्येक महिलने या पुस्तकाद्वारे मेनोपॉज प्रक्रियेविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन दत्तू बोडके यांनी केले.
Comments are closed.