- जाहिरात क्षेत्रातील नवनवीन प्रवाह, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान वापरावर व्याख्यान आयोजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर हा राष्ट्रीय जाहिरात दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध ठिकाणी जाहिरातींचे महत्त्व, समाजातील त्यांची भूमिका आणि आधुनिक माध्यमांमधील बदल यावर चर्चासत्रे व उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. नाशिक ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन (नावा) तर्फे ही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, ते जाहिरात क्षेत्रातील नवनवीन प्रवाह, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर मार्गदर्शन करणार आहेत.
फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग आंत्रपृणर्स असोसिएशन ( फेम) चे अध्यक्ष रवी पवार यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात नामांकित जाहिरातदार, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता, रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन नावा चे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष अमोल कुलकर्णी, सरचिटणीस दिलीप निकम, उपाध्यक्ष साहिल न्याहारकर, सुनील महामुनी, कार्याध्यक्ष गणेश नाफडे, सहचिटणीस नितीन शेवाळे, सल्लागार संचालक डॉ अभिजित चांदे, खजिनदार राजेश शेळके, माजी अध्यक्ष प्रवीण चांडक, विठ्ठल राजोळे, नितीन राका तसेच संचालक दिनेश गांधी, शैलेश दगडे, दीपक जगताप, पराग गांधी, श्याम पवार, रविराज खैरनार आदींनी केले आहे
Comments are closed.