- विस्तारित पोहोच आणि सक्षम जाळ्यासह उद्योजकीय भावनेप्रती आपली वचनबद्धता दृढ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (केएमबीएल/कोटक) आज ‘कोटक बिझलॅब्स अॅक्सिलरेटर प्रोग्राम’च्या सीझन-२ च्या लाँचची घोषणा केली. हा कार्यक्रम ‘कोटक’च्या प्रमुख ‘सामाजिक उत्तरदायित्व’ (सीएसआर) उपक्रमाचा एक प्रभावी विस्तार आहे. यामध्ये सुरुवातीच्या महसूल टप्प्यातील स्टार्टअप्सना सखोल मार्गदर्शन, बाजारपेठेतील प्रवेश आणि उत्प्रेरक निधीसह पाठिंबा दिला जातो, त्या अनुषंगाने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या सीझन २ मध्ये संपूर्ण भारतातील ७५ हून अधिक स्टार्टअप्सना सहाय्य केले जाणार आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान (डीप-टेक) शाश्वतता, स्वच्छ ऊर्जा, फिनटेक, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान (एडटेक), कृषी तंत्रज्ञान (अॅग्रीटेक) आणि आरोग्य तंत्रज्ञान (हेल्थटेक) आदींवर सतत लक्ष केंद्रित केले जाईल. हा उपक्रम उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतात आपल्या राष्ट्रीय पाऊलखुणा वाढवत असून, आयआयटी दिल्लीच्या ‘फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर’ला (एफआयटीटी) नवीन सक्षम सहाय्यक म्हणून आमंत्रित करतो, जो आयआयएमए व्हेंचर्स, एनएसआरसीईएल – आयआयएम बंगळूरु आणि टी-हबबरोबर जोडलेला आहे. उपक्रमाची (व्हेंचर्स) निवड आणि गतीवर्धन सहाय्यकांद्वारे व्यवस्थापित केले जाते.
‘कोटक नेहमीच भारतातील उद्योजकीय योजनांना पाठिंबा देण्यावर विश्वास ठेवतो, हे केवळ महानगरांमध्येच नाही तर टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये जिथे कल्पकता भरभराटीला येते,’ असे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे ‘सीएसआर‘ आणि ‘ईएसजी‘ (पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन) विभाग प्रमुख हिमांशू निवसरकर म्हणाले. ‘कोटक बिझलॅब्स अॅक्सिलरेटर प्रोग्रामच्या सीझन-२‘सह, आम्ही मोठे स्वप्न पाहण्याचे आणि धाडस करणाऱ्या संस्थापकांप्रती आमची वचनबद्धता वाढवत आहोत,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘कोटक बिझलॅब्स ही आमची एकप्रकारे जे बोलतो, ते कृतीत आणण्याची पद्धत आहे, भारताचे भविष्य खरोखर घडवू शकणाऱ्या धाडसी स्वप्नांना बळकटी देण्याचे हे एक ध्येय आहे,’ असे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे अध्यक्ष – समृद्ध, एनआरआय आणि बिझनेस बँकिंगचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भसीन म्हणाले. ‘आम्हाला विश्वास आहे की जेव्हा तुम्ही योग्य कल्पनांना योग्य हेतूने पाठिंबा देता तेव्हा चमत्कार घडतो. हीच ‘हौसला है तो हो जाएगा‘ची भावना आहे.‘
‘एनएसआरसीईएल‘चे सीईओ आनंद श्री गणेश म्हणाले, की ‘कोटक बिझलॅब्सच्या दुसऱ्या सीझनद्वारे भारताच्या गतिमान स्टार्टअप परिसंस्थेला सक्षम करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेबरोबर पुन्हा एकदा भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विविध क्षेत्रातील आशादायक स्टार्टअप्सना सखोल मार्गदर्शन, बाजारपेठेतील प्रवेश आणि उत्प्रेरक निधी प्रदान करून, हा उपक्रम महानगरांव्यतिरिक्त टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये परिवर्तनकारी नवकल्पनांना प्रेरणा देतो. ”एनएसआरसीईएल‘मध्ये, आमचे ध्येय भारताच्या विकासाला चालना देणारे प्रभावी उपाय तयार करणाऱ्या धाडसी उद्योजकांना पोषण देण्याच्या कोटकच्या दृष्टिकोनाशी थेट जुळते.‘
इन्क्युबेशन भागीदार, आयआयएमए व्हेंचर्स चिंतन बक्षी म्हणाले, की “कोटक बिझलॅब्सना वेगळे करणारी गोष्ट म्हणजे टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील संस्थापकांना दिले जाणारे सखोल आणि संरचित समर्थन, ज्यामध्ये काही कठीण सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हाने सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणारे स्टार्टअप्स आहेत. आयआयएमए व्हेंचर्सच्या भागीदारीत, हा उपक्रम गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील विविध स्टार्टअप्सच्या संस्थापकांना बहुस्तरीय मार्गदर्शन, समर्थन प्रदान करण्यासाठी संरचित आहे, ज्यामध्ये स्थानिक गुंतवणूकदार आणि मालमत्ताधारक (हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स – एचएनआयएस) सक्रिय करण्यासाठी चार शहरांमध्ये कार्यक्रम, ‘आयआयएमए‘ येथे सखोल मूलभूत प्रशिक्षण आणि संरचित मार्गदर्शन तसेच तांत्रिक सहाय्य दिले जाते.‘
‘कोटक बिझलॅब्स अॅक्सिलरेटर प्रोग्राम‘च्या पहिल्या सीझनमध्ये ३२ उच्च-क्षमतेच्या स्टार्टअप्सना कृषी तंत्रज्ञान, हवामान तंत्रज्ञान, फिनटेक, एडटेक, आरोग्यसेवा, स्वदेशी कला आणि हस्तकला, डीपटेक, क्लीनटेक आणि शाश्वतता यासारख्या क्षेत्रातील यशस्वी उपायांसाठी अनुदान देण्यात आले. हे उपक्रम आधीच नोकऱ्या निर्माण करत आहेत, लोकांच्या अतिरिक्त निधीद्वारे भांडवल उभारत आहे आणि कल्पकता तसेच उद्देशाने वास्तविक जगातील आव्हाने सोडवत आहेत. पहिल्या सीझनच्या यशाने कोटकला त्यांचे प्रयत्न वाढवण्यास, दुसऱ्या सीझनमध्ये कार्यक्रमाची पोहोच आणि महत्त्वाकांक्षा वाढविण्यास प्रेरित केले आहे.
Comments are closed.