नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ८ वीतील विद्यार्थी अर्णव युवराज झोमण याची १४ वर्षाखालील राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल कॅम्पसाठी निवड झाली आहे. हा कॅम्प ६ ऑक्टोबर पासून कुपराज फुटबॉल ग्राउंड, मुंबई येथे सुरु झाला आहे.
अर्णव याच्या निवडीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले.
Comments are closed.