NGN News
Latest Marathi News

मुख्यमंत्री उद्या नाशकात; उत्त्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीस मार्गदर्शन करणार

  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर दौरा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी ( दि. १० ) नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उत्त्तर महाराष्ट्र विभागीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.

सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मुख्यमंत्री पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरात प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांशी निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. पुढील चार ते सहा महिन्यांच्या काळात महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगर पंचायती आदी निवडणुका पार पडणार आहेत. यासंदर्भात पक्षाची रणनीती, संघटन, राजकीय समीकरणे याचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. दुपारनंतर मुख्यमंत्री फडणवीस हे संभाजीनगरला रवाना होणार असल्याचेही सावजी आणि केदार यांनी सांगितले.

Comments are closed.