- ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांची विशेष उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील ‘शब्दमल्हार प्रकाशन’ प्रकाशित आणि कवयित्री, लेखिका कविता गायधनी लिखित पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते येत्या शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
‘जन्माची शिदोरी’, ‘प्राणलयीची माळ’, हे ललित लेखसंग्रह आणि ‘मौनाचे कवडसे‘ हा कवितासंग्रह अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी होणार असून विश्वास ठाकूर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होइल.
यापूर्वी कविता गायधनी यांची ‘जिव्हाळ्याचे मेघ’ हा कवितासंग्रह आणि ‘वृत्तीचि निवृत्ति’ हे आध्यात्मिक लेखनाचे पुस्तक अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक बागवे यांचे काव्यविषयक विचार श्रोत्यांना ऐकावयास मिळतील; तरी साहित्यप्रेमींनी कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे; असे आवाहन ‘शब्दमल्हार’ आणि गायधनी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
Comments are closed.