NGN News
Latest Marathi News

विद्युत भवन येथे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवार (०७ ऑक्टोबर) रोजी रामायण रचयिता महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते  महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.  

याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, उपमुख्य, औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, वरिष्ठ व्यवस्थापक मुरलीधर गवळी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षवर्धन जगताप, व्यवस्थापक हेमंत भामरे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. .

Comments are closed.