नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील ‘पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या संयुक्त वर्गणीतून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाख रुपये रक्कमेचा सामाजिक उत्तरदायित्व निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल कौतुक व्यक्त केले. हा निधी अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी देण्यात आला आहे. पूरग्रस्ताना स्थानिक स्तरावर मदतीसोबतच आर्थिक मदत व्हावी ही सामाजिक जाणीव जागृत ठेवून केलेला हा प्रयत्न आहे.
Comments are closed.