NGN News
Latest Marathi News

‘क्रोमा’चे नाशिकमध्ये सातवे स्टोर सुरु; महाराष्ट्रातील विस्तारात नवी झेप

  • सणासुदीच्या निमित्ताने ३५% पर्यंत आकर्षक सूट योजनांची मेजवानी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतातील विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा परिवारातील एक सदस्य, क्रोमाने नाशिकमध्ये आपले सातवे स्टोर सुरु करून महाराष्ट्रातील १०० पेक्षा जास्त स्टोर्सचे वाढते नेटवर्क आणखी मजबूत केले आहे.

नाशिकमधील नवीन क्रोमा स्टोरचा पत्ता – युनिट नंबर २ – ९ (तळमजला) आणि युनिट नंबर १०२ (पहिला मजला), विराज ट्रेड सेंटर, जेल रोड, नाशिक. ४२१९ चौरस फुटांचे, दोन मजली स्टोर नाशिकमधील सर्वात व्यस्त आणि भरपूर वर्दळीच्या भागात आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस यासारख्या महत्त्वाच्या संस्था तसेच तपोवन, रामकुंड आणि गोदावरी नदी अशी प्रमुख ठिकाणे आजूबाजूला आहेत. नाशिकमधील जेल रोडवर पारंपरिक ठिकाणे व आधुनिक नागरी विकास यांचा मिलाप पाहायला मिळतो, त्यामुळे राहण्यासाठी तसेच खरेदीसाठी हा भाग सोयीचा आहे.

नवीन स्टोरविषयी इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले, “विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. नाशिकमध्ये वाढीला प्रचंड वाव आहे. जेल रोडवर आमचे नवीन स्टोर सुरु करून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आमच्या ग्राहकांच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही त्यांना फक्त उत्पादने देत नाही तर तंत्रज्ञानाच्या वेगळ्या जगात घेऊन जाणारे डेमो, तज्ञांचे मार्गदर्शन आणि क्रोमाच्या विश्वसनीय सेवा यांच्यासह खरेदीचा एक परिपूर्ण अनुभव प्रदान करतो. या भागातील प्रत्येक कुटुंबासाठी तंत्रज्ञान सहज उपलब्ध होण्याजोगे, विश्वसनीय आणि उत्साहवर्धक असावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि या स्टोरचे उदघाटन करून आम्ही ही वचनबद्धता अधिक मजबूत केली आहे.”

सणासुदीच्या निमित्ताने सध्या सुरु असलेल्या आकर्षक योजनांबरोबरीनेच, नवीन स्टोरच्या उदघाटनासाठी ग्राहकांना पुढील ऑफर्सचा लाभ घेता येईल:

लॉन्च ऑफर्स

  • विंडोज लॅपटॉप्सवर ४% पर्यंतची सूट
  • अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर ६% पर्यंतची सूट

सणासुदीच्या निमित्ताने ऑफर्स

  • टीव्हीवर ३५% सूट
  • स्मार्टफोन्सवर १५% सूट
  • रेफ्रिजरेटर्सवर २५% सूट
  • वॉशिंग मशिन्सवर ३०% सूट
  • एअर कंडिशनर्सवर ३५% सूट
  • घरातील आणि स्वयंपाकघरातील छोट्या उपकरणांवर ३५% सूट
  • होम ऑडिओवर ३०% सूट

हे स्टोर दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू राहील. उत्पादने, सेवा आणि सध्या सुरु असलेल्या लॉन्च ऑफर्सविषयी माहितीसाठी नाशिकमधील नवीन क्रोमा स्टोरला भेट द्या किंवा www.croma.comला भेट द्या.

या ऑफर्स निवडक ब्रँड्स, कॅटेगरीज आणि मॉडेल्सवर लागू आहेत. लॉन्च ऑफर्स किंवा फेस्टिव ऑफर्स या दोन्हींपैकी फक्त एका ऑफरचा लाभ घेता येईल, या दोन्हींना एकत्र करता येणार नाही. अटी व शर्ती लागू आहेत.

Comments are closed.