शिवस्वराज्य मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मखमलाबाद परिसरातील शिवस्वराज्य कला,क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ विद्यानगरतर्फे विजयादशमी निमित्त दरवर्षी प्रमाणे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नवरात्रीतील घटाची विजयादशमीनिमित्त तळी भरणे हा कुळाचार सर्वत्र करण्यात येतो मात्र ही तळी पुरूषांच्या हातून भरली जाते. मात्र शिवस्वराज्य मित्र मंडळातर्फे विजयादशमीची तळी कन्यांच्या हातून भरण्यात येते. मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो.
नवरात्र हा आदिमाया आदिशक्तीचा जागर करण्याचा तसेच स्री शक्तीचा जागर करण्याचा उत्सव असल्याने मंडळातर्फे स्री-पुरूष समानतेचा संदेश देणारा हा उपक्रम राबविला जातो. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव डॅा.ऋषिकेश जयंत आहेर तसेच प्रा.सौ.वैशाली आहेर-कोकाटे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो.
यावर्षीची तळी स्वानंदी आहेर, नुपुर ठाकरे, दिशा सागर, हर्षदा परचंडे, पलक शर्मा, श्रद्धा शिंदे, खुशी शर्मा या कन्यांच्या हातून भरन्यात आली. यावेळी जयंत आहेर, डॅा.ऋषिकेश आहेर,प्रा.वैशाली आहेर-कोकाटे, तृप्ती आहेर, अमेय औटे, मयुर गोळे, ओम मुठेकर,पवन कानकाटे, संध्या ठाकरे, प्रथमेश चव्हाण, कुणाल मुर्तडक, श्लोक शिंदे,प्रेम मुठेकर,जतिन जाधव,जयेश भोईर,शुभम राठोड,संकेत माळी, आर्चिस राजोळे, ऋषिकेश सागर आदींसह नागरिक उपस्थित होते.
Comments are closed.