नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सगुणा बहुउद्देशीय संस्था व सगुणा महिला मंच आयोजित नवरात्रोत्सवातील गरबा-दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पी. डी. गांगुर्डे सांस्कृतिक भवन, समर्थ नगर, तपोवन लिंक रोड येथे पार पडला. महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामुळे महिला भगिनींनी या उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला.
या सोहळ्यासाठी प्रसिद्ध सिने व टीव्ही कलाकार (जुनिअर) शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या उपस्थितीत धमाल मस्ती आणि मिमिक्रीसह बहारदार गाण्यांचे शोही सादर करण्यात आले. परिसरातील महिला व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नवरात्रोत्सवाचा सोहळा रंगला. स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे घोषित करण्यात आले : प्रथम बक्षीस सौ. सिमा हंगेकर द्वितीय बक्षीस वैशाली शिंदे व तृतीय बक्षीस सौ. रोहिणी पाटील, उत्तेजनार्थ बक्षीस प्रमिला काठे यांना देण्यात आली अशी अनेक बक्षीसे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष राजेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवज्ज्वा गांगुर्डे, मनीषा काळे, मायाताई सोनने, सुरेखा वाघ, रुचा गांगुर्डे यांच्यासह महाराष्ट्राची शान व माऊली भजन मंडळ, जागृती हास्य क्लब, परिसस्पर्श महिला मंडळ यांचे सहकार्यात करण्यात आले. प्रसाद नागवंशी, संजय खरे, शशांक उन्हवणे, दत्ता गांगुर्डे, दीपक कटारे व विजय अहिरे यांनीही या कार्यक्रमाला हातभार लावला.सगुणा महिला मंचने या उपक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या कलेसाठी व विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन एक आदर्श सामाजिक कार्यक्रम राबवला, ज्यामुळे नाशिकमधील महिलांमध्ये उत्साह व आनंदाची लहरी पसरली.
Comments are closed.