** राहुल सुराणा
घोटी : एनजीएन न्यूज नेटवर्क
जैन समाजाचे श्रद्धा स्थान असलेले आचार्य संत उमेशमुनीजी यांच्या स्मृतीनिमित्त घोटी येथे जैन भवन येथे तीन दिवसीय अणु स्मृती दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये समाजातील महिलांनी हिरारीने सहभाग घेऊन अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
घोटी शहरात जैन समाजाच्या महिलांनी सामाजिक तसेच धार्मिक कार्यात योगदान देण्यासाठी चंदना श्राविका संघटन सुरु करण्यात आलेला असून अनेक सामाजिक व धार्मिक कार्यात या महिला नेहमीच अग्रेसर असतात . जैन समाजाचे आचार्य संत उमेशमुनीजी यांचा चातुर्मास घोटी शहरात सन २००४ मध्ये संपन्न झाला असून . त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसीय अणु स्मृती दिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये धार्मिक वक्तृत्व तसेच धार्मिक भजन , धार्मिक प्रदर्शन आदी स्पर्धचे आयोजन जैन भवन येथे करण्यात आले. तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. स्मृती दिवस निमित्त अनेक समाज बांधवानी जप, तप आदी केले.
त्याप्रसंगी जैन समाजाचे समाज बांधव आदी यावेळी उपस्थित होते. स्पर्धेकरिता निर्णयाधिकारी म्हणून सुचिता शाह व चंदनबाला श्रीश्रीमाळ म्हणून होते. तसेच विविध स्पर्धामध्ये सौ रुपाली सुराणा, सौ किरण पिचा, सौ श्रद्धा कोचर, सौ श्वेता पिचा व ग्रुप ,सौ सुवर्णा कुमट व ग्रुप , सौ. वंदना नहाटा व ग्रुप , सौ वैशाली लुणावत व ग्रुप, सौ स्नेहा छाजेड व ग्रुप आदींनी पारितोषिक पटकाविले. कार्यक्रमाचे आयोजन चंदना श्राविका मंडळाच्या अध्यक्ष सौ सोनाली पिचा, पिनल बागमार , जयश्री पिचा , भावना कुमट, सुषमा पिचा आदी महिलांनी केले.
याप्रसंगी जैन बांधवानी प्रत्येक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.
@ प पू उमेशमुनीजी मसा यांच्याप्रती घोटी शहरातील जैन बांधवांची विशेष भक्ती असून त्यांची धार्मिक शिकवण हि आम्हास नेहमीच प्रेरणादायी असते , त्यांच्या भक्तीप्रती सदर ग्रुपची स्थापना झाली असून आम्ही संघटनच्या सर्व महिला धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देत असतो.
सौ सोनाली पिचा , अध्यक्ष चंदना श्राविका संघटन, घोटी
Comments are closed.