गांधीनगर : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील क्रिएटिव्ह माईंडस स्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त नऊ कुमारीकांची पाद्य पूजा करण्यात आली. यावेळी लहान मुलींनी आकर्षक आणि सुंदर वेशभूषा करून देवी बनून उपस्थितांची दाद मिळावली. यामुळे शालेय वातावरणाला वेगळाच रंग प्राप्त झाला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सजलेल्या मुलींसोबतच शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले. यावेळी पारंपरिक गरबा नृत्य सदर करण्यात आले.
या उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या संस्थापक मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे, शिक्षिका कविता गुरव, पूजा वानखेडे, आशा दिवे, संगीता बागुल, पोर्णिमा शर्मा आदींनी परिश्रम घेतले.
Comments are closed.