नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक महानगरपालिका फार्मासिस्ट संघटनेच्या वतीने फार्मासिस्ट दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यात महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागातील ७० पेक्षा अधिक फार्मासिस्ट बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला आणि या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभाग घेतला. याप्रसंगी व्यासपीठावर सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ जितेंद्र धनेश्वर, नोडल ऑफिसर डॉ प्रशांत शेटे,डॉ चारुदत्त जगताप, डॉ अशोक गायकवाड,डॉ शैलेश लोंढे,डॉ शेवाळे तसेच ज्येष्ठ फार्मासिस्ट बाजीराव सोनवणे, राजेंद्र पाठक, सुरेंद्र बोरा, नंदकुमार कापसे हे उपस्थित होते.
उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या मनोगतात फार्मासिस्ट करीत असलेल्या सेवेचा व कार्याचा गौरव करून सांगितले की,”आरोग्य यंत्रणेतील व सेवेतील फार्मासिस्ट हे पद डॉक्टर इतकेच महत्त्वाचे असून तुम्ही सर्व विशेषतः नाशिक महानगरपालिकेत अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने ही सेवा देत आहात व आपल्या महानगरपालिकेचा नावलौकिक वाढवीत आहात. रोज शेकडो रुग्णांची फार्मासिस्ट बंधू-भगिनींचा संबंध येतो व या सर्वांना औषधोपचार देऊन व त्यांच्याशी दोन शब्द गोड बोलून त्यांना सेवा देण्यात आपण आपला आनंद शोधतात हे खरच एक मोठं कार्य आहे. रोजच्या आपल्या नोकरीत रुग्णांची संवाद साधताना अनेक वादाचे छोटे-मोठे प्रसंग येतात परंतु आपण आपला तोल ढळू न देता प्रामाणिकपणे ही सेवा बजावत असतात.
सेवानिवृत्त, सध्या सेवेत असेलेले व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील 70 फार्मासिस्ट बंधू-भगिनी या उपक्रमात हजेरी लावली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने या सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.उपस्थित सर्व फार्मासिस्ट गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या आरोग्य सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात झालेल्या विविध मनोरंजनात्मक खेळांमध्ये सर्वांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. कोमल भावसार,दर्शना पन्हाळे यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले तर अर्चना उगले आणि तेजस्विनी चकोर यांनी त्यांना या कामात सहकार्य केले. देवेंद्र धिवरे, श्याम शिरुडे,अनिल कोठावदे चंद्रशेखर पालवे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed.