NGN News
Latest Marathi News

बागलाणला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले; पिकांचे नुकसान

दोन महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू; सरसकट आर्थिक मदतीची मागणी

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

बागलाण तालुक्यातील भाक्षी , मुलाने, चौगाव, कौतिक पाडे, जायखेडा, आखतवाडे, आनंदपुर, गोराणे, कुपखेडा, कोटबेल आधी परिसरात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या असलेल्या मका, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान वादळी वाऱ्यांमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन एक वृद्ध पुरुष व दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. शासनाने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांनी केली आहे.

बागलाण तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करीत जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे काही भागात घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी घरांची पडझड होऊन जीवित हानी झाली आहे. तालुक्यातील गोराणे येथील वयोवृद्ध देवचंद गोपाळ सोनवणे (९४) हे आपल्या कुटुंबीयांसह नितीन देसले यांच्या शेतात राहत होते शनिवारी रात्री आपल्या घरात झोपलेले असतानाच पावसामुळे घराची भिंत कोसळून भिंतीखाली दाबले गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. तर त्यांची सून निर्मलाबाई नामदेव सोनवणे (४३) गंभीर जखमी झाल्याने नामपुर येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला झाला. तसेच खालचे टेंभे येथे घराची भिंत कोसळून कस्तुराबाई भिका अहिरे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची वृत्त समजताच जायखेडा जायखेडा चे पोलीस व तहसीलचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली.

वादळी वाऱ्यासह बरसलेल्या या पावसामुळे शेतातील कापण्यासाठी तयार असलेले मक्याचे पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तर नुकतीच लागवड झालेल्या कांदा पिकांच्या शेतात तुडुंब पाणी भरल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

Comments are closed.