NGN News
Latest Marathi News

यशस्वी ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळ्यात नऊ तेजस्वीनींचा गौरव !

  • डॉ. अश्विनी बोरस्ते, शितलताई भामरे, रत्नमाला राणे आदींचा समावेश

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कोंडाजी बापू वावरे महाविद्यालय, उत्तमनगर येथे सॅटेलाईट रोटरी क्लब व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ‘यशस्वी नवदुर्गा सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात समाज, शिक्षण, सहकार, राजकारण, गृहिणी, व्यवसाय व व्यापार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ तेजस्विनींचा गौरव करण्यात आला.

व्यासपीठावर रोटरी क्लब नाशिक वेस्टचे अध्यक्ष श्री. राम पगारे, माजी अध्यक्ष श्री. आदित्य जाजू, प्राचार्य डॉ. सोपान कुशारे, उपप्राचार्य प्रा. निकम, प्रा. घुले, प्रा. रविराज वटवे , तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मिलिंद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक महिला सशक्तीकरण व बचतगट चळवळीतून कार्यरत राहून 22 वर्षे महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या, अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते यांना ‘यशस्वी नवदुर्गा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष राम पगारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिव आणि शक्ती यांच्या एकत्रितपणातूनच समाजकार्यातील समतोल साधला जातो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे शक्तीचा सन्मान असून, महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा तसेच गुणगौरव समारंभ नसून समाजातील पुरुषांनी एकत्रित येऊन रोटरी क्लबच्या माध्यमातून स्त्रियांच्या कर्तव्यपरायणतेच्या तसेच महिलांच्या कार्यगौरवाचा हा सोहळा आहे.”

या सोहळ्यात माजी नगरसेविका शितलताई भामरे, डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते, रत्नमाला राणे, डॉ. सरिता जाधव श्रीमती दरोडे सौ संगीता कुशारे चौगुले सौ निकम यांच्यासह इतर मान्यवर महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे समाजातील महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार उपप्राचार्य डॉक्टर घुले सरांनी मानले.

Comments are closed.