NGN News
Latest Marathi News

बजाज फिनसर्व्ह हेल्थची विदाल हेल्थ आणि ‘सिरम’ सोबत भागीदारी

  • ‘विदाल हेल्थ’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू होणारा हा पहिलाच अभिनव आरोग्य उपक्रम –
    संपूर्ण सोयीस्कर आणि कॅशलेस सेवा देत एचपीव्ही लस अधिक सुलभ होणार
  • प्रतिबंधात्मक, डिजिटल-प्रथम आरोग्यसेवा पुरविण्याच्या ‘विदाल हेल्थ’च्या उपक्रमाचा हा एक
    भाग.

नाशिक / पुणे : एनजीएन न्यूज नेटवर्क

प्रतिबंधात्मक आणि डिजिटल प्रणालीला महत्त्व देणाऱ्या आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टीपीए सेवा पुरवठादार असलेल्या ‘विदाल हेल्थ’ने आणि जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) प्रा. लि. ने, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधासाठी एक धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे.

दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून, ‘विदाल हेल्थ’चा डिजिटल प्लॅटफॉर्म हा पहिल्यांदाच एचपीव्ही लसीसाठी सर्वकष (एंड-टू-एंड), कागदपत्रविरहित, सोयीस्कर आणि कॅशलेस अनुभव देणारा असेल. यावर डॉक्टरची वेळ ठरवण्यापासून, संमतीपत्र भरणे आणि प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंत सगळी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात असतील. हा संपूर्णपणे व्यवस्थापित आरोग्य कार्यक्रम औषधांच्या डोसच्या वेळेची आठवण, उपचारांचे पालन आणि नेटवर्क व्यवस्थापन यांमध्ये मदत करणार आहे. त्यातून सातत्यपूर्ण देखभाल करणे रुग्णांना शक्य होईल.

विदाल हेल्थ ही बजाज फिनसर्व्ह हेल्थची १०० टक्के मालकीची उपकंपनी आहे. बजाज फिनसर्व्ह हेल्थ हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून आरोग्यसेवा क्षेत्रातील विखुरलेल्या प्रणालींना तो एकत्र आणतो आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, ओपीडी सेवा, टेलीमेडिसिन आणि प्रीपेड आरोग्यसेवा प्रदान करतो.

‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज म्हणाले, “भारतातील आरोग्यसेवा क्षेत्र सध्या आजार झाल्यानंतरच्या उपचारांवरून प्रतिबंधात्मक उपचारांकडे वळत आहे. आयुष्मान भारतसारख्या योजनांमुळे ही परिवर्तनाची गती वाढली आहे. बजाज फिनसर्व्ह हेल्थमध्ये आम्ही एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म उभारतो आहोत, जो लोकांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम करतो. ‘सिरम इन्स्टिट्यूट’सोबतची भागीदारी आमच्या लसीकरण उपक्रमाची सुरुवात ठरत आहे. या डिजिटल सोयींमुळे वैयक्तिक व कॉर्पोरेट ग्राहक आरोग्याविषयीचा दीर्घकालीन खर्च वाचवू शकतील आणि राष्ट्रीय आरोग्य सुधारण्यात हातभार लावू शकतील.”

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, “गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, तिचा प्रभाव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्धता व जनजागृती गरजेची आहे. विदाल हेल्थसोबतची भागीदारी ही तंत्रज्ञानाच्या मदतीने लसीकरण अधिक कार्यक्षम व व्यापक पद्धतीने पोचविण्याचे साधन आहे. ती आमच्या प्रयत्नांना बळ देते. तिच्या माध्यमातून अत्यावश्यक लसी अधिक सहजपणे उपलब्ध करून जनतेचे आरोग्य सुधारण्याचा आमचा उद्देश आहे.”

‘विदाल हेल्थकेअर सर्व्हिसेस लि.’च्या कार्यकारी संचालिका नीथा उत्तय्या म्हणाल्या, “सिरम इन्स्टिट्यूटशी आम्ही भागीदारी केली, ती आरोग्यसेवा सर्वसमावेशक व सुलभ करण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण पायरी आहे. पारदर्शक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा देण्यासोबतच, क्लेम प्रक्रिया व वेलनेस प्रोग्रॅम्स या आमच्या विद्यमान सेवांमध्ये ही योजना भर घालते. संपूर्णपणे व्यवस्थापित अशा या उपक्रमाच्या माध्यमातून भारतात वाढत चाललेल्या हॉस्पिटलायझेशनचा व वैद्यकीय स्वरुपाचा खर्च कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरोग्य व्यवस्थेला तो अधिक परिणामकारक बनवेल.”

‘विदाल’ची ही योजना केवळ एक भागीदारी न राहता, आरोग्यसेवा प्रदाते, लस उत्पादक आणि आरोग्य सेतू यांसारख्या राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म्सना एकत्र आणते. एक मजबूत, आपसांत एकत्र जोडलेली आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा यातून उभारण्यात येत आहे. ‘विदाल हेल्थ’चा प्लॅटफॉर्म सध्या डॉक्टरांचा सल्ला, नैदानिक चाचण्या, आरोग्य तपासण्या, वेलनेस कार्यक्रम आणि आरोग्यविषयक वित्तसेवा देत आहेच, आता त्यात एचपीव्ही लसीकरणाच्या सुविधेची थेट डिजिटल स्वरूपात भर पडली आहे. ही सुविधा मधल्या कोणत्याही दलालांशिवाय किंवा विलंबाशिवाय रुग्णांना मिळू शकणार आहे. ग्राहक या प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्वरुपात नोंदणी करू शकतात, कॅशलेस पेमेंट करू शकतात, आणि लसीकरणाच्या डोसचा ट्रॅकही ठेवू शकतात. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कार्यालयात किंवा ‘विदाल हेल्थ’च्या नेटवर्कमधील क्लिनिकमध्ये लसीकरण करून घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. हा संपूर्ण कार्यक्रम पारदर्शक, सर्वसमावेशक आणि परवडणाऱ्या किमतीत राबवण्यात आला आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा.

Comments are closed.