- संपूर्णपणे स्वदेशी असे हे उत्पादन फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार
- अचूकता आणि कार्यक्षमतेसह पिकांची सक्षमपणे काळजी घेणार
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक आणि शेती यंत्रसामग्री कंपन्यांपैकी आघाडीच्या महिंद्रा फार्म इक्विपमेंट बिझनेसने महिंद्रा एअरोटेक टर्बो 600 अल्फा लाँच केला आहे. बागायती पिकांसाठी उच्च-कार्यक्षमता असलेला कॉम्पॅक्ट आणि शक्तिशाली असा हा स्प्रेअर आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे तयार करण्यात आलेला हा पुरस्कारप्राप्त स्प्रेअर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची (एम अँड एम) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एम.आय.टी.आर.ए.ने (महिंद्रा इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड रिसर्च फॉर ऍग्रीकल्चर) विकसित केला आहे. या स्प्रेअरमुळे भारतातील सर्वोत्तम असलेल्या फलोत्पादन क्षेत्रातील यांत्रिक फवारणीला नवीन आयाम मिळेल.
प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या फळपिकांसाठी डिझाइन केलेले महिंद्रा एअरोटेक टर्बो 600 अल्फा स्प्रेअर मशीन आकाराने अत्यंत कॉम्पॅक्ट आहे आणि प्रत्यक्षात बागेतील जागेचा अंदाज घेऊन तयार केले आहे. शक्तिशाली 75 एलपीएम डायफ्राम पंपासह 600 लिटर क्षमतेचा एक मजबूत कॉम्पॅक्ट टँक, आणि 32 मीटर/सेकंदापर्यंत हवेच्या आउटपुटसाठी उच्च-कार्यक्षमता असलेला 616 मिमी पंखा यामुळे AIROTEC टर्बो 600 अल्फा संपूर्ण प्लांटमध्ये एकसारखी फवारणी करतो. यामुळे पारंपरिक पद्धतींमध्ये होत असलेल्या असमान फवारणीवर तोडगा निघतो. महिंद्रा तसेच नॉन-महिंद्रा ट्रॅक्टर मॉडेल्ससाठीही योग्य असलेले अल्फा स्प्रेअर वजनाला हलके आहे आणि यात ट्रॅक्टर इंधनाचा देखील कमी वापर करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी उत्कृष्टतेसह व्यावहारिक अंतर्दृष्टीचे संयोजन करून, नवीन स्प्रेअर म्हणजे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक कामांचे
यांत्रिकीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मौल्यवान गुंतवणूक आहे. नवीन महिंद्रा एअरोटेक टर्बो 600 अल्फा स्प्रेअरच्या लाँचिंगबद्दल महिंद्रा फार्म इक्विपमेंट बिझनेसच्या फार्म मशिनरी आणि प्रिसिजन फार्मिंगच्या उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख डॉ. अनुषा कोठंदरमन सांगतात, “पीक संरक्षणासाठीच्या यांत्रिकीकरणात भारतात लक्षणीय वाढ होत असतानाच आमचा नवीन कॉम्पॅक्ट स्प्रेअर महिंद्रा एअरोटेक टर्बो 600 अल्फा लाँच करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्याचे कॉम्पॅक्ट डिझाइन, उत्तम वैशिष्ट्ये आणि हाताळण्यास सोपा असल्याने आमचा नवीन स्प्रेअर चांगल्या उत्पादन गुणवत्तेसाठी नाजूक फळे आणि फुलांचे संरक्षण सुनिश्चित करेल. ही नवीन श्रेणी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या प्रमुख बाजारपेठांमधील महिंद्रा मित्रा डीलरशिपमध्ये उपलब्ध आहे.”
अरुंद द्राक्षमळ्यातून प्रवास करताना किंवा डाळिंबाच्या बागांमध्ये हलक्या हाताने फवारणी करताना, AIROTEC Turbo 600 Alpha प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि सक्षम भागीदार म्हणून उभा ठाकतो. AIROTEC Turbo 600 Alpha
स्प्रेअर वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा रसायनांचा वापर कमी झाला आहे, मजुरीमध्ये बचत झाली आहे. फवारणी जलद आणि अचूक
होते. योग्य फवारणीमुळे कीडही लांब राहते. शेतीची उत्पादकता तसेच एकूण उत्पादन वाढवण्यासाठी, वेळ आणि श्रम वाचवण्यातही ही फवारणी महत्त्वाची भूमिका बजावते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिकांचा दर्जा उत्तम राखला जातो.
या फवारणीचे नियंत्रण पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातात असेल अशा पद्धतीने रचना करण्यात आलेला AIROTEC Turbo 600
Alpha 2-स्पीड + 1-न्यूट्रल गिअरबॉक्ससह येतो. यामुळे शेतकऱ्यांना हवामान परिस्थिती आणि विशिष्ट पिकांच्या गरजेनुसार
पंख्याचा वेग समायोजित करता येतो. नवीन स्प्रेअरचे कमी-उंची प्रोफाइल उच्च-घनतेच्या बागांमध्ये नाजूक फुले आणि फळांचे
संरक्षण करण्यासाठी आवश्यक कॅनोपी आणि ट्रेलीस सिस्टम अंतर्गत सुरक्षित हालचाली शक्य करते. AIROTEC Turbo 600 Alpha ची नवीन कॉम्पॅक्ट टँक रासायनिक-प्रतिरोधक द्रव्यांपासून बनवली आहे, जी टिकाऊपणा आणि दीर्घ ऑपरेशनल लाइफ सुनिश्चित करते. कॉम्पॅक्ट टँक डिझाइन, 3-ऍक्सिस टो बारसह, द्राक्षांच्या नियोजनबद्ध रांगांमधून सहज हालचाल करणे शक्य होते. यामुळे द्राक्षांचा वेल किंवा कोवळ्या फळांचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो. या नवीन फवारणी यंत्रांमुळे पिकांसोबतचा थेट संपर्क कमी होतो, परिणामी पिके एकसंध राहण्यास मदत होते. महत्त्वाचे म्हणजे, पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात नुकसान टळते.
वाढीव कार्यक्षमतेसाठी, स्प्रेअरमध्ये 12 टू वे समायोज्य पितळी नोझल समाविष्ट आहेत. जे अचूक रासायनिक प्रयोग आणि
कमीतकमी नुकसान करतात. 5-मोड कंट्रोलर स्प्रे दाब, दिशा आणि कव्हरेज करण्यास सक्षम करते. ज्यामुळे विविध ठिकाणी
आणि पीक वाढीच्या टप्प्यांवर अचूक, प्रतिसादात्मक फवारणी करता येते. नवीन स्प्रेअरचा ब्रास अॅजिटेटर फवारणीच्या संपूर्ण प्रक्रियेत रासायनिक द्रावण योग्यरित्या मिसळून ठेवतो ज्यामुळे त्यात गाळ साचत नाही. परिणामी एकसमान वापर करणे शक्य होते. प्रेशर रिलिफ व्हॉल्व्ह सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये पंप आणि ऑपरेटर दोघांचेही संरक्षण करतात, तर शेतात चिखल असल्यास किंवा जमीन असमान असेल तरीही टायर मड स्क्रॅपर्स सुरळीत ऑपरेशन सुनिश्चित करतात.
Comments are closed.