NGN News
Latest Marathi News

पूरग्रस्तांना कुटुंबनिहाय 10 किलो गहू-तांदूळ; छगन भुजबळ यांची माहिती

आत्तापर्यंत 2654 कुटुंबाना मदत ; केंद्राची मदत 100 टक्के येण्याची ग्वाही

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यातील पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 2654 कुटुंबाना मदत केली आहे. साडेसव्वीस मेट्रिक टन गहू तांदूळ दिला आहे, आमच्या विभागाकडून अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे प्रसारमाध्यम संवादात दिली.

केंद्राची मदत 100 टक्के येईल, संकट मोठे असल्याने मदतीची वाट न बघता बाधीत लोकांना मदत करायला सरकार पुढे येईल. पंचनामा झाल्यानंतर किती मदत द्यावी हे स्पष्ट होईल, असेही भुजबळ यांनी म्हटले. पहिल्या टप्प्यात मदत केली आहे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असा पाऊस यापूर्वी आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. ढगफुटी अनेक ठिकाणी होतं आहे, ग्लोबल वॅार्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. पाऊस पडत नाही तर कोसळतोय. त्यामुळे, टाऊन प्लॅनिंग करताना विचार व्हायला हवा, असेही भुजबळ यांनी म्हटले.  

Comments are closed.