NGN News
Latest Marathi News

सावाना आयोजित विनोदी कथा स्पर्धेत गायकर यांची कथा प्रथम

इगतपुरी : विशेष प्रतिनिधी 

सार्वजनिक वाचनालय नाशिकचे ( सावाना ) वतीने आयोजीत राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत आहुर्ली, (ता इगतपुरी ) येथील सुप्रसिध्द लेखक नवनाथ अर्जुन पा.गायकर यांच्या विनोदी कथेस प्रथम क्रंमाक नुकताच जाहिर झाला आहे.

सुप्रसिध्द विनोदी साहित्यिक कै. चंद्रकांत महामिने यांचे स्मृती निमित्ताने दरवर्षी सा.वा.ना.चे वतीने आयोजीत विनोदी कथा स्पर्धेा आयोजीत केली जाते. यंदा या स्पर्धेत नवनाथ गायकर यांच्या ‘नावात काय आहे ?’ या विनोदी कथेचे प्रथम क्रंमाकाचे पारितोषिक जाहिर झाले आहे. गायकर हे ख्यातनाम लेखक असुन यापुर्वीही सावाना आयोजित अ.वा.वर्टी कथा स्पर्धेत त्यांच्या कथेस प्रथम, प्रतिभा साहित्य संघ अकोट,जि. अकोला आयोजीत कथा स्पर्धेत प्रथम तर मार्मिक साप्ताहिक आयोजित स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली आहेत. सदर पारितोषिक वितरण सोहळा लवकरच साहित्य मेळाव्यात मान्यवराचें हस्ते होणार आहे.

Comments are closed.