NGN News
Latest Marathi News

अभिमानास्पद ! थायरॉइडवरील स्मार्ट बेल्ट संशोधनासाठी प्राचार्य शितल पाटील यांना पेटंट

  • दुहेरी यश : संशोधनपर निबंधासाठी डॉक्टरेटदेखील प्राप्त

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

थायरॉइड ग्रंथीशी निगडीत T3, T4 या हार्मोनचे प्रमाण तपासणीबाबत केलेल्या संशोधनास येथील रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राचार्य शितल जनार्दन पाटील (पवार) यांना भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.

आधुनिक काळामध्ये कोणत्याही औषधे, सौदर्य प्रसाधने यामध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी रासायनिक घटक (Methyl Paraben, Propyl Paraben etc.) वापरली जातात. सततच्या वापरने या घटकांचा दीर्घकाळानंतर मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. परंतु अशी रसायने न वापरल्यास त्या प्रसाधनाची (shelf life) दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता कमी होते. म्हणून, अशी रासायनिक घटके (Chemical) बदलून त्यामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे घटके वापरून (उदा. Menthol, Pulegone पुदिनामध्ये आढळून येणारे) अशी औषधे, सौंदर्य प्रसाधने दीर्घकाळ टिकविता येतात, असे संशोधन प्राचार्य शीतल पाटील यांनी केले आहे

विशेष म्हणजे प्राचार्य शीतल पाटील यांनी रक्ताचे नमुने न घेता T3, T4 या हार्मोनचे प्रमाण तपासणी विकसित केली आहे. त्यांतर्गत मानेसाठी विशिष्ट पट्टा ( बेल्ट) आणि नियंत्रक युनिट तयार करून हा स्मार्ट बेल्ट तयार केला. हे एक डिझाईन पेटंट म्हणून भारत सरकारने त्याला मान्यता दिली. या संशोधनपर निबंधासाठी शीतल पाटील यांना डॉक्टरेटदेखील प्राप्त झाली आहे. दरम्यान, या दोन्ही यशाबद्दल प्राचार्य शीतल पाटील यांचे रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.