NGN News
Latest Marathi News

कळसुबाई माता,कामाक्षीदेवी, घाटनदेवी देवीस्थळी घटस्थापना

घोटी : राहुल सुराणा

  पितृपक्ष समाप्त होवून नवरात्र उत्साहास सुरुवात झाली असून घोटी शहरासह इगतपुरी तालुका नवरात्र उत्साहात प्रारंभ झाला आहे.  इगतपुरी तालुक्यात नवरात्र उत्सवात वातावरण भक्तिमय असते कारण कळसुबाई देवी,कावनाईची कामाक्षीमाता, इगतपुरीची घाटनदेवी या देवींचे शक्तिस्थळ याच तालुक्यात आहे.तसेच घोटी शहरातही नवरात्र उत्सवाची धूम जोरात असते.त्यामुळे गुरुवारी  घटस्थापना  घोटी शहरात  व परिसरातील नागरिकानी  घट स्थापणा मोठ्या प्रमाणात केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी वरुणराजाची विशेष कृपा आहे.  

         घोटी-इगतपुरी शहरातील विविध भागांत धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धा तसेच  रासदांडियाचे आयोजन केले जाते. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत तालुक्यासह घोटीत भक्तिमय,सांस्कृतिक,व मनोरंजनात्मक वातावरण असते तसेच इगतपुरी घोटीत विविध मंडळाकडून दररोज विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 
      घोटी शहरात घट स्थापनेकरीता बाजारपेठ सजली होती घटस्थापनकरिता आवश्य असणारी साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहक राजाची एकच  झुंबड उडाली होती , पितृ पक्षाचे १५ दिवस सरल्यानंतर येणाऱ्या नवरात्रीचे घोटी व परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत केले . व तालुक्यामध्ये या वर्षी रेकॉर्डब्रेक पर्जन्यमान  झाल्यामुळे भक्तामध्ये सुद्धा खरेदीचा उत्साह जाणवत होता . नवरात्र उत्साहात तरुणाईचा मोठ्या प्रमाणात उत्साह जाणवून येत आहे. 
       घोटी शहरातही अन्नपूर्णा देवी अंबिका देवी,मरी माता ,सप्तशृंगी देवी, आदि देवींची मंदिरे असून तेथेही घटस्थापना झाली असून .घोटी शहरात नवरात्र उत्सवात अखंड हरिनाम सप्ताहाची १११ वर्षाची आदर्श परंपरा आहे.ग्रामीण भागातही हाच उत्साह व जल्लोष कायम आहे. घटस्थापनेच्या दिवशी घोटी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गर्दी होती . संध्याकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळाची घट स्थापनासाठी वाद्यवृंदासह  मिरवणूक  सुरु होती . 

Comments are closed.