NGN News
Latest Marathi News

छावा क्रांतिवीर सेनेचा दसरा मेळावा श्रीक्षेत्र गणपती राजूर येथे होणार

  • संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आढावा बैठक तसेच श्रीक्षेत्र राजुर गणपती या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी प्रदेश कार्यकारणी विभागीय कार्यकारणी व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न.

जालना | एनजीएन न्यूज नेटवर्क

जालना जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही छावा क्रांतिवीर सेनेचा सातवा भव्य दसरा मेळावा श्रीक्षेत्र गणपती राजूर,ता.भोकरदन,जि.जालना येथे शुक्रवार,दि. ३ ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज मंत्री,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहणार असून,या अनुषंगाने जालना जिल्ह्याच्या वतीने जोरदार नियोजन सुरू आहे.

या दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित समाजाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती यांना एकत्र आणणे.जातीभेद विसरून,महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपणे व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे,हा या मेळाव्याचा मूळ उद्देश आहे.शेतकरी,शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक प्रश्नांवर खुली चर्चा घडवून आणणे,शासनापर्यंत विविध मागण्या पोहोचवणे आणि समाजप्रबोधन घडवून आणणे,यावर या मेळाव्यात भर दिला जाणार आहे.

संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडणारा हा मेळावा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता, विचारांचा,हक्कांचा आणि सामाजिक परिवर्तनाचा पर्वणीसदृश सोहळा म्हणून साजरा केला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सर्व सूचना देण्यात आल्या.या बैठकीत छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत,युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.किरण डोखे,नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे,मराठवाडा सचिव भगवान सोरमारे,छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख कृष्णा काळे यांनी सविस्तर असे मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले.

बैठकीचे आयोजन जालना जिल्हाप्रमुख राम पाटील गाडेकर,ग्रामीण जिल्हाप्रमुख विनोद पुंगळे,मराठवाडा कार्याध्यक्ष महादेव कदम,जालना जिल्हा कार्याध्यक्ष गजानन ढवळे,भोकरदन तालुका अध्यक्ष विनोद सावंत,बीड जिल्हा शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख अविनाश तांदळे,संतोष परभुमरे,गणेश पुंगळे,आकाश पुंगळे,तुकाराम पाटील भुतेकर,विठ्ठल पुंगळे,दीपक भूमकर,उमेश पुंगळे,युवराज डुंबरे,वैजनाथ पाटील बोरुडे,सोनाजी पाटील गारखेडे,प्रवीण गातवे,विठ्ठल राठोड,बंडू मडके,विनोद पाटील ढवळे,विष्णू पाटील माकोडे,बाबासाहेब ढवळे,संतोष सावंत,संतोष मोरे,प्रवीण गवळी,बाबासाहेब खरात,उमेश वाघ, पवन तळेकर,महादू हिवाळे,गजानन तांबे,मिलिंद तांबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन छावा क्रांतिवीर सेना अठरापगड समाजाला एकत्र आणत आहे.हा मेळावा कुठल्याही एका समाजासाठी नसून सर्व घटकांच्या विचारांना आणि हक्कांना बळ देण्यासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ साठे,महाराणा प्रताप,अहिल्यादेवी होळकर या थोर महापुरुषांच्या विचारांचे सोन लुटायचे असेल,तर ३ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र गणपती राजूर येथे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी उपस्थित राहावे.”

  • करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना

Comments are closed.