NGN News
Latest Marathi News

इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना मारहाण; त्र्यंबकेश्वर येथील प्रकार

  • तिघे जखमी; समाजाच्या सर्व थरांतून निषेध

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सिंहस्थासंदर्भात होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी निघालेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधीना त्र्यंबकेश्वर येथे काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात तीन पत्रकार जखमी झाले असून, त्यापैकी एकाला नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर घटना शनिवारी दुपारी स्वामी समर्थ केंद्राजवळील कमान परिसरात घडली. गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी, पत्रकारांवर अचानक हल्ला केला. पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित तरुणांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. जखमी पत्रकारांना त्र्यंबकेश्वर येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाला नाशिकला खासगी रुग्णालयात आणण्यात आले. योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजणे अशी या पत्रकारांची नवे आहेत. या मारहाणीचा समाजाच्या सर्व थरांतून निषेध करण्यात येत आहे. घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. 

मंत्री भुजबळ यांच्याकडून विचारणा

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. रुग्णालयात जावून भुजबळ यांनी जखमी पत्रकाराच्या तब्येतीची विचारपूस केली. दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना भुजबळ यांनी पोलिसांना केली.  

Comments are closed.