NGN News
Latest Marathi News

नशामुक्त भारत संकल्पासाठी २१ सप्टेंबरला धावणार नाशिककर !

‘भाजयुमो’ च्या वतीने नमो युवा रन स्पर्धा: सहभागी होण्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा उपक्रम राबवण्यिात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत भाजयुमोच्या वतीने येत्या २१ सप्टेंबरला ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेवर आधारीत नमो युवा रन (मॅरेथॉन) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनसाठी आतापर्यंत सुमारे ४  हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

नशामुक्त भारत होण्यासाठी तरुणांचा विशेषःत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होणे यासाठी व्यापक प्रमाणतात जनजागृती करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ६.०० वा. अनंत कान्हेरे मैदान त्रंबक रोड, नाशिक या ठिकाणाहून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे.  याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व  मंत्री,खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासह राज्य शासनातील सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील  शालेय /महाविद्यालय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी  सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक यांना तसेच सर्व शासकिय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या बरोबरच त्यांच्या अधिनस्त कार्यालय/संस्थेतील जास्तीत जास्त नागरिकांनी/विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

————————————–

युवा पिढीच्या नशामुक्तीसाठी उपक्रम..

 नवीन पिढी आज नशेमुळे भरकटते आहे . त्यांना नशा मुक्त करण्यासाठी, त्यांना व्यायामाचे सवय लावण्यासाठी ,त्यांना पळण्याची सवय लावण्यासाठी, नशा मुक्त भारत या संकल्पनेवर आधारित नमो युवा रन मॅरेथॉन आयोजित केली आहे. देशातील नव्या युवा पिढीला नशा मुक्त करण्यासाठी हा संदेश त्यांना देण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊयात,देश सेवेत समर्पित नेतृत्वाच्या प्रती आपले ऋण हे व्यक्त करूयात याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .

  • गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र राज्य.

Comments are closed.