तळेगाव आगार येथे माजी आमदार जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस फलकाचे अनावरण
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कामगार नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस या संघटनेचे पुणे विभागातील तळेगाव आगार येथे फलकाचे अनावरण गुरुवारी ( दि.१८) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रीतीश छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगारातील बहुसंख्य पदाधिकारी कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
अध्यक्ष छाजेड यांचे स्वागत फटाक्याच्या आतिष बाजीमध्ये करण्यात आले. आगार प्रशासक यांची भेट घेऊन प्रशासनाने कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय करू नये , सर्वांना समान वागणूक देण्यात यावी असा गर्भित इशारा अध्यक्ष प्रीतीश छाजेड
यांनी दिला. त्यानंतर बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस संघटनेचे राज्य सरचिटणीस आर डी गवळी, पुणे विभागाचे विभागीय सचिव राज्य तथा राज्य कार्याध्यक्ष रमेश शिंदे , राज्य कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, राज्य महिला आघाडी प्रमुख प्रदेश अध्यक्षा अर्चना भोमले आदींनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही जर प्रशासनाने अन्याय केला तर वेळप्रसंगी प्रशासनाविरुद्ध संघर्ष करण्यास संघटना मागे पुढे पाहणार नाही. बैठकीच्या शेवटी अमोल रणदिवे यांनी आभार मानले. बैठकीस तळेगाव आगाराचे अध्यक्ष कैलास राऊत, सचिव रंजीत वाघमारे , विभागीय कार्याध्यक्ष अमोल रणदिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
सदर बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली. तळेगाव आगारातील सर्व ज्येष्ठ व तरुण पदाधिकारी हजर होते.
Comments are closed.