NGN News
Latest Marathi News

सुरक्षित महामार्ग आणि मजबूत समाजासाठी आयएचपीएल वचनबद्ध

वाहतूक पोलीस, स्थानिक गावकरी, प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या मतांना प्राधान्य

इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील 96.64 किमी लांबीचा वडापे-गोंडे पट्टा विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेडने (IHPL) सुरक्षा, टिकाऊपणा आणि सामुदायिक सहभागाच्या साहाय्याने ही जबाबदारी पेलण्याचे निश्चित केले आहे. पारंपरिक पठडीच्या पलीकडे जात केवळ हा पट्टा विकसित करण्याचीच जबाबदारी नव्हे तर अन्य जबाबदाऱ्यांच्या पूर्ततेसाठी कंपनी प्रयत्न करते आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम दर्जाचा महामार्ग देण्यासोबतच, येथे उत्तम सुरक्षा, आरोग्य यंत्रणा आणि अन्य सुविधा पुरवण्यासाठी IHPL इगतपुरी, नाशिक आणि ठाणे येथील वाहतूक पोलीस, स्थानिक गावकरी, प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मते विचारात घेते आहे.

आयएचपीएलने या संपूर्ण कॉरिडॉरमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी वाहतूक पोलीस आणि अंमलबजावणी करणाऱ्या अन्य संस्थांसोबत काम केले आहे. मिशन सुरक्षा आणि अन्य मोहिमांद्वारे, शाळकरी मुले, ट्रक चालक आणि प्रवाशांना रस्त्याचे नियम तसेच एकूणच जबाबदार वर्तनाची माहिती देण्यात आली आहे. रस्त्यावरील धोका, अपघात कमी करण्यासाठी करणारे रेडियम स्टिकर्स, शैक्षणिक साहित्य, रेनकोट आणि जॅकेट वितरित करण्यात आले. महामार्गावरील कोणत्याही अडचणीसाठी अनेकदा पोलीस आणि वाहतूक कर्मचारीच पहिल्यांदा मदतीला धावून येतात. आणि त्यांच्या या सामाजिक कार्यासाठीच ते ओळखले जातात.

आरोग्य आणि वेळेवर आपत्कालीन प्रतिसाद याकडेही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. याचे महत्त्व ओळखूनच आयएचपीएलने पडघा सरकारी रुग्णालयातील आपत्कालीन केंद्रात आधुनिक वैद्यकीय उपकरणांसह सुधारणा केली आहे. यामुळे अपघात तसेच गंभीर प्रकरणे तातडीने हाताळणे सोयीचे होणार आहे. रक्तदान मोहीम, सुरक्षा कवायती तसेच प्रशिक्षण शिबिरांमुळे कामगार आणि स्थानिकांची सुरक्षा भक्कम होते आहे.

इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड (IHPL) चे प्रकल्प प्रमुख हेमंत कुमार म्हणाले, “वडापे-गोंडे कॉरिडॉरचा प्रवासी तसेच आसपासच्या गावांना देखील फायदा झाला पाहिजे असा आमचा दृष्टिकोन आहे. केवळ रस्त्याचे काम करणे एवढाच आमचा उद्देश नाही तर त्या पलीकडे जाऊन आरोग्यसेवा उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रमांचा अवलंब आणि महामार्ग सुरक्षित तसेच स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वच्छता कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आणि ट्रॅफिक मार्शल यांसारख्या खऱ्या हीरोंचा सन्मान केला जाईल.”

वडापे-गोंडे कॉरिडॉरमध्ये पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धनाला आयएचपीएलचे प्राधान्य आहे. म्हणूनच 2024 च्या अखेरीपासून, रात्री ड्रायव्हिंग करताना डोळ्यांवर येणारा उजेड कमी करण्यासाठी तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 11,000 हून अधिक रोपे महामार्गाच्या मधल्या पट्ट्यात लावण्यात आली आहेत. प्रतिकूल हवामानातही निःस्वार्थपणे सेवा देणारे स्वच्छता कामगार, सामाजिक स्वयंसेवक आणि ट्रॅफिक मार्शल यांचा आयएचपीएलने ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’, या उपक्रमांतर्गत सन्मान केला. या पडद्याआडच्या खऱ्या हीरोंचे कौतुक करून, कंपनीने महामार्गाचे काम सुरळीत सुरू ठेवणे तसेच सुरक्षित समाजासाठी सर्वांवर असलेल्या सामायिक जबाबदारीची निकड आणि मूल्य प्रकर्षाने अधोरेखित केले आहे.

केवळ दोन ठिकाणांना भौगोलिक दृष्ट्या जोडणे एवढेच आयएचपीएलचे ध्येय नाही तर त्या माध्यमातून लोकांचे आयुष्य सुखकर करता येईल अशा पायाभूत सुविधा निर्माण करणे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. रस्ता सुरक्षा, सामाजिक सहभाग आणि शाश्वत विकासावर नव्याने लक्ष केंद्रित करून, आपला महामार्ग हा प्रगती आणि समुदाय कल्याणासाठी जीवनरेखा म्हणून काम करेल याची खात्री करण्यासाठी आयएचपीएल सक्रिय पावले उचलत आहे.

Comments are closed.