NGN News
Latest Marathi News

उद्धव निमसे यांना अखेर अटक; गुंडाविरोधी पथकाकडून ताब्यात

पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असताना कारवाई

पंचवटी : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरातील बहुचर्चित राहुल धोत्रे हत्याकांडातील प्रमुख संशयित तथा भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असलेल्या निमसे यांना सोमवारी ( दि. १५ ) गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले.

गेल्या बैलपोळ्याच्या दिवशी किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीत राहुल धोत्रे या युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात उद्धव निमसे मुख्य संशयित आरोपी होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते फरार होते. यादरम्यान त्यांनी नाशिक सत्र न्यायालयात दाखल केलेला जमीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने निमसे यांच्यासमोर पोलिसांना शरण येण्यावाचून तरणोपाय राहिला नव्हता. ते पोलिसांना शरण येणार अशा चर्चा झडत असतानाच आज गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून त्यांना त्यांना ताब्यात घेतले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या या प्रकरणातील चौकशीला आता वेग येणार आहे.

Comments are closed.