NGN News
Latest Marathi News

मविप्र विद्यापीठास ‘ग्रीन सिग्नल’; ९ हजार ४५० सभासदांचा ‘आवाज’ बाजूने

  • वार्षिक सभेत सर्व सात विषय बहुमताने मंजूर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली मविप्रची बहुचर्चित १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (१४) रोजी कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात पार पडली, यावेळी विषय पत्रिकेतील इतर ७ विषयांसोबत ‘मविप्र विद्यापीठ’ स्थापनेच्या प्रस्तावास आवाजी बहुमताने सभासदांनी मंजुरी दिली. विद्यापीठ मंजुरीला तब्बल ९ हजार ४५० सभासदांनी पाठिंबा दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेप्रसंगी व्यासपीठावर सरचिटणीस ॲड, नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवाजी गडाख, ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. आर. के. बच्छाव, ॲड. संदीप गुळवे, रवींद्र देवरे, रमेश पिंगळे, कृष्णाजी भगत, प्रविण जाधव, नंदकुमार बनकर, विजय पगार, डॉ. प्रसाद सोनवणे, अमित बोरसे, महिला सदस्य शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, सेवक सदस्य प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर, माजी सरचिटणीस निलीमाताई पवार, माजी सभापती माणिकराव बोरस्ते, माजी अध्यक्ष अरविंद कारे, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. अभिमन्यू पवार, अशोक पवार, भाऊसाहेब खातळे, डॉ. विलास बच्छाव, डॉ. विश्राम निकम, नारायण हिरे, विजय गडाख, पुंडलिक थेटे, अंबादास बनकर, सचिन पिंगळे यांसह माजी पदाधिकारी उपस्थित होते.

विषय पत्रिकेचे वाचन शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांनी केले. दुखवटा ठराव मालेगाव तालुका संचालक ॲड.रमेशचंद्र बच्छाव यांनी मांडला. यावेळी सर्वानुमते कार्यक्रम पत्रिकेतील विषयांना मंजुरी देण्यात आली. या विषयांमध्ये मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, सन २०२४-२५ चा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे.उत्त्पन्न व ताळेबंद पत्रके यांना मंजुरी देणे. मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांचे एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे. हिशोब तपासणीसाची नेमणूक करणे, संस्थेच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करून विकासात्मक बाबींचा विचार करणे. संस्थेच्या ध्येय धोरणा नुसार पुढील कार्याची दिशा ठरविणे, व मविप्र विद्यापीठास मंजुरी देणे यांचा समावेश होता.

यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविकात पीपीटीद्वारे वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण केले. या वर्षात संस्थेने ६ नवीन शाखा सुरू केल्या असून, त्यात एक कम्यूनिटी रेडियो केंद्र, जनशिक्षण संस्थान अंतर्गत आदिवासी कौशल्य विकास केंद्र, इंग्रजी माध्यम होरायझन अकॅडेमी (नांदगाव), आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल खेडगाव, ता. दिंडोरी, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मोहपाडा, ता. सुरगाणा, आदींचा समावेश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संशोधनाला गती, शिक्षकांचे प्रशिक्षण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राची सांगड, तंत्रज्ञान, रोजगार संधी आणि कौशल्यांचा शोध या उद्देशांच्या पूर्तीसाठी या शाखा सुरू करण्यात आलेल्या आहेत. संस्थेने संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी अस्वली येथील शाळेसाठी १९ गुंठे जमीन देणगी म्हणून दिली.

मविप्र मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या जागा ३० ने वाढून १५० झाल्या, अभियांत्रिकी व पॉलीटेक्निकच्या प्रवेश क्षमतेमध्ये तिपटीने वाढल्या आहे. तसेच संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्षात १३ मराठा उद्योजक मेळावे घेण्यात आले त्यातून १६० कोटींचा व्यवसाय वाढला. तसेच येत्या २६ ते २८ डिसेंबर दरम्यान विश्व मराठी साहित्य संमेलन संस्थेच्या प्रांगणात होणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून गॊरविण्यात आल्याची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, मविप्र पत्रिका, सेंटर फॉर एक्सलन्स, माजी विद्यार्थी व कर्मचारी संघ, नवीन शाखा, प्लेसमेंट, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, संशोधन व पेटंट, विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी, शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक योजना, मध्यवर्ती कार्यालय व अन्य शाखांना प्राप्त देणग्या तसेच बांधकाम आढावा, नॅक मानांकने आदी विषयांवर माहिती दिली.

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ३१ मार्च २०२४ रोजी संस्थेच्या सर्व शाखांचे व मध्यवर्ती कार्यालयाचे कर्ज २६ कोटी ७५ लाख १२ हजार ७०० रुपये इतके बाकी होते. अहवाल काळात संस्थेने ७ कोटी ५६ लाख १४ हजार ३३६ रुपये इतक्या कर्जाची परतफेड केलेली असून, दिनांक ३१.०३.२०२५ रोजी संस्थेवर १९ कोटी १८ लाख ९८ हजार ३६४ रुपये कर्ज बाकी होते. अशी मविप्र संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

एक सदस्यीय समिती स्थापणार..

@ मविप्र विद्यापीठ प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याआधी, कार्यकारिणीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मा. संदीप शिंदे यांची एक सदस्यीय समिती स्थापन करून त्याद्वारे विद्यापीठाच्या आर्थिक बाबी, पात्रता आणि विद्यापीठाचे मविप्र संस्थेकडे असलेले स्वामित्व याबाबतीत सभासदांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात येईल.

अध्यक्षांनी शब्द फिरवला..

  • मविप्र विद्यापीठ सभासदांच्या कायद्याचे कसे होईल याविषयी वार्षिक सभासदांना शुभेच्छा सर्व सभासदांना संबोधित करावे असे आव्हान अध्यक्ष डॉक्टर ढिकले यांनी सरचिटणीस यांना केले होते प्रत्यक्ष मात्र सरचिटणीसांना पुरेसा वेळ न देता विद्यापीठाच्या विषयात बगल देत त्यांनी शब्द फिरवला. लागलीच त्यांच्या समर्थकांनी सभेत गोंधळ घालत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंध सभासदांनी मविप्र विद्यापीठ प्रस्तावास मंजुरी देत, सभासदांच्या भल्यासाठी हे विद्यापीठ झालेच पाहिजे असे आवाजी मताने मंजूर केले .यासोबतच अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणावा, अशी विनंती केली.

१. मविप्रचे अंदाजपत्रक १ हजार ८७ कोटींचे
मविप्र संस्थेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ११५९ कोटी ५५ लाखांचे आहे. या आर्थिक वर्षात युजीसीकडून १ कोटी ३९ लाख अनुदान मिळाले आहे.

२. मविप्र HRDC सेंटर मध्ये ३७६१ सेवकांना प्रशिक्षण
मविप्र एचआरडीसी मार्फत अहवाल काळात कार्यात्मक कौशल्य व वर्तन विकास या विषयावर आयोजित करण्यात आला. त्यात 3३७६१ सेवक आणि सहभाग घेतला.

३. दोन हजार ७५१ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
संस्थेच्या विविध शाखांमध्ये होणाऱ्या कॅम्पस रिक्रूटमेंट अंतर्गत एकाच वर्षात तब्बल दोन हजार ७५१ विद्यार्थ्यांना विविध कंपन्या, संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

४. पीचडी,नेट सेट व पेटंट प्राप्त प्राध्यापक वर्ग
संस्थेचे सुमारे २३३ प्राध्यापक आणि शिक्षक पीचडी,नेट, सेट व पेटंट प्राप्त उत्तीर्ण झाले आहे.

५. भविष्यातील योजना
संस्था लवकरच मविप्र स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ, होमिओपॅथी महाविद्यालय, फूड टेक्नोलॉजी, आयुर्वेद महाविद्यालय, दंत वैद्यक महाविद्यालय, पशुवैद्यक महाविद्यालय, मिल्ट्री प्रीपेटरी स्कूल, कौशल्य विकास विद्यापीठ, बी.एस्सी एव्हीएशन,मविप्र कबड्डी करंडक, अभ्यासक्रम लवकरच सुरू केल्या जाणार आहेत.

Comments are closed.