NGN News
Latest Marathi News

‘शिवसेना उबाठा’च्या रणरागिणी रस्त्यावर; ‘ माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन

भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा केला निषेध‘; घोषणांनी परिसर दणाणला

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पहेलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱ्या मोदी सरकार विरोधात शिवसेना उबाठाच्या वतीने रविवारी हिंदुस्तान-पाकिस्तान सामन्याविरुद्ध ‘माझं कुंकू माझा देश’ या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. नाशिकमध्ये शिवसेनेच्या शेकडो महिलांनी रविवारी रस्त्यावर उतरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत आंदोलन केले.

हिंदुस्तान-पाकिस्तान सामना खेळण्यास परवानगी देणारे केंद्र सरकार विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यांच्या हाकेला साद घालत शिवसेना नाशिक जिल्हा महिला आघाडीचे वतीने शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौक नाशिक येथे मोदी सरकारचा निषेध नोंदवून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकार हाय.हाय ,पाकिस्तान मुर्दाबाद, जवान मरतो सीमेवर.. मोदी जगतात बिर्याणीवर, हमारा सिंदूर – हमारा देश, शिवसेना जिदांबाद, नही चलेगी नही चलेगी दादागीरी नही चलेगी, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बीसीसीआयचे आध्यक्ष जय शहा यांच्या प्रतिमेस बांगड्याचा हार घालून जोडे मारण्यात आले. सौभाग्याचे लेणं मोदींना पाठवून निषेध नोंदवणार आहे.

या आंदोलनात शिवसेना कोअर कमिटी सदस्या भारती ताजनपूरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, जिल्हा समन्वयक कीर्ती जवखेडकर, उपजिल्हा संघाटक शोभा दोंदे, फैमिदा रंगरेज, शोभा दिवे, युवतीसेना आधिकारी योगिता गायकवाड, मनिषा हेकरे, महानगर संघटक रंजना थोरवे, सुवर्णा काळूगे,शोभा वाल्डे, शोभा पवार, महानगर समन्वयक मंदा गवळी,उषा गायखे,विभाग संघटक ज्योति गोडसे, ज्योती, कुमावत शिवसेना महिला आघाडी महानगर पदाधिकारी विठाबाई पगार, शारदा दोंदे, माधुरी पाटील, अश्विनी मते,कविता सरोदे आदींसह शेकडो महिला पदाधिकारी सहभागी झाल्या.

Comments are closed.